राम कुणाचा कुणाचा
Pradnya Sachin Metkar Pradnya Sachin Metkar
2.14K subscribers
6,366 views
89

 Published On Jan 29, 2024

कौमुदी परिवार

संचालिका - सौ. सुनिता तळवेलकर.

तबला - श्री अभिजीत वैद्य.

जोगेश्वरी भजनी मंडळ, नाशिक.


राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायील त्याचा राम कुणाचा
राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा राम कुणाचा || धृव||

पुत्र कुणाचा कुणाचा पुत्र दशरथाचा
पुत्र कुणाचा कुणाचा पुत्र कौशल्येचा राम कुणाचा ||१||

बंधु कुणाचा कुणाचा बंधु लक्ष्मणाचा
बंधु कुणाचा कुणाचा भरत शत्रुघ्न चा राम कुणाचा ||२||

नाथ कुणाचा कुणाचा नाथ जानकीचा
स्वामी कुणाचा कुणाचा स्वामी हनुमंताचा
राजा कुणाचा कुणाचा राजा अयोध्येचा राम कुणाचा ||३||

राम कशात कशात शबरीच्या भक्तीत
राम कशात कशातअहिल्येच्या मुक्तीत
राम कशात कशात खारीच्या शक्तीत राम कुणाचा ||४||

राम कशात कशात तुलसीच्याकवनात
राम कशात कशात दासांच्या बोधात
राम कशात कशात भजनाच्या रंगात राम कुणाचा ||५||

show more

Share/Embed