12. सावळ्या हरी | Sawalya Hari
Amol Deshmukh Amol Deshmukh
17.1K subscribers
214,397 views
1.2K

 Published On May 19, 2020

गाण्याचे बोल:

सावळ्या हरी ऐकू द्या तरी

सावळ्या हरी ऐकू द्या तरी
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली
चला जाऊ पुसायला || धृ ||

रखुमाई म्हणते फुगवून गाल
भक्तांच्या तालावर ह्यांचा हो ताल
काय ठेवलंय या भक्तांच्या घरी
ऊठसूठ घुसायला.. अगंबाई
ऊठसूठ घुसायला || १ ||

ही कोण मेली जनी का बनी
तिची कशी केली वेणी फणी
दळण कांडण करुनी गेला
लुगडी धुवायला.. बाई बाई
लुगडी धुवायला || २ ||

तो कोण मेला तुकोबा वाणी
त्याने कशी लिहिली चार दोन गाणी
तेवढ्यासाठी का विमान धाडायचं
फुक्कट बसायला.. हो का
फुक्कट बसायला || ३ ||

आणखी एक तो सावता माळी
त्याची मोट ही ह्याने घेतली
मळ्याची केली फुक्कट बागायत
बसला राखायला.. अरे वा
बसला राखायला || ४ ||

नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला
अंगात आल्यावाणी लागला नाचायला
बरं झालं तिकडे कबीर होता
सावध करायला.. बरं का
सावध करायला || ५ ||

तुझा नि माझा करुनी धावा
असा काय करतेस त्यांच्याशी कावा
भक्तीच्या दोरीने याला बांधावा
आपलंसं करायला.. हो हो
आपलंसं करायला || ६ ||

रखुमाई उठली गालात हसली
चला जाऊ पाहायला ||

आनंद भजनी मंडळ, धनकवडी, पुणे

show more

Share/Embed