किती किती आनंद ग सांगु अंबाबाई
Pradnya Sachin Metkar Pradnya Sachin Metkar
2.14K subscribers
2,876 views
46

 Published On Oct 19, 2023

कौमुदी परिवार

संचालिका - सौ. सुनिता तळवेलकर.

हार्मोनियम - सौ. प्रज्ञा मेतकर.

तबला - जयेश चव्हाण.

चिंतामणी भजनी मंडळ, नाशिक.


किती किती आनंद ग आनंद ग सांगु अंबाबाई
तुझिया स्वरूपाला बघतांना मन हे तल्लीन होई ||धृव. ||

या या प्रपंची प्रपंची नित्याचे काहूर
त्यातुन गवसले जगदंबेचे विश्रांतीचे घर
त्यात नामाचे नामाचे बांधीले मंदिर
आत देखीली साजिरी मुर्ती ही जोगाई || १ ||

या या सखयांनो सेवाया आनंदाची लूट
हृदय मंदिर भक्ती ने भरीले काठोकाठ
भक्ती प्रेमाची मायेची उंचावली लाट
न्हाऊ घालते प्रेमाने ही माय जोगाई || २ ||

सद्गुरु कृपेची कृपेची झुळझुळ वाहे गंगा
गंगा माईने माईने घडविले सत्संगा
नववीध भक्तीच्या भक्तीच्या खेळु या नवरंगा
एक निष्ठेचा जोगवा घाली मजला आई || ३ ||

show more

Share/Embed