२४ वर्ष वय, अनुभव नाही तरीही Chhatrapati Shivaji Maharaj Statue बनवण्याचं काम, Jaydeep Apte आहे कोण?
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
356,645 views
5.1K

 Published On Aug 26, 2024

#BolBhidu #JaydeepApte #ChhatrapatiShivajiMaharajStatue

त्यांनी जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनवला आहे आणि त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. २८ फूट उंचीचा ब्रॉन्झचा असा हा पुतळा बनवायला ३ वर्ष लागतात, पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला प्रारंभ करुन डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला, जयदीप आपटे यांचं वय अवघं २४ वर्ष आहे, २०२३ च्या डिसेंबर महिन्यात सनातन प्रभातच्या अंकात आलेल्या या बातमीची आता जोरदार चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे, ज्या जयदीप आपटेंचं या बातमीमधून कौतुक करण्यात आलं होतं, त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी २६ ऑगस्टला कोसळला, त्यानंतर हा पुतळा उभारण्याचं काम ज्यांच्या कंपनीला देण्यात आलं होतं, त्या जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयदीप आपटे यांनीच शिवरायांच्या या पुतळ्याचं नमुना शिल्प बनवलं होतं आणि त्यानुसार २८ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचं कामही त्यांच्याच आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर जयदीप आपटे यांचं नाव चर्चेत आलं आहे, त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे, पण जयदीप आपटे आहेत कोण ? त्यांनी हे काम कसं पूर्ण केलं ? याबद्दल त्यांनी काय खुलासे केले होते ? जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed