मस्त मलईदार फ्रुटखंड | Tempting Creamy Creamy Fruit Khand |
A-1 Sugras Recipes | ए-1 सुग्रास रेसिपीज A-1 Sugras Recipes | ए-1 सुग्रास रेसिपीज
123 subscribers
19 views
2

 Published On Oct 11, 2024

मस्त मलईदार फ्रुटखंड | Tempting Creamy Creamy Fruit Khand |

A-1 Sugras Recipes
ए-1 सुग्रास रेसिपीज
Amita Date
@amitadate4509

#youtube #vadarecipe #trending #recipe #food #sweet #sweetrecipe #indiandessert #indiansweetrecipe #A1Suugrasrecipe #frurecipe #fruitkhand #fruitkhandrecipe

*साहित्य: Ingredients
1) दूध 1 लिटर | 1 liter milk
2) साखर 200 ग्रॅम | 200 gram sugar
3) 1 कप दूध | 1 bowl Milk
4) 1/2 टीस्पून वेलची पूड | 1/2 teaspoon cardamom powder
5) 1/2 टीस्पून जायफळ पूड | Nutmeg powder
6) थोड्या केशर काड्या | some Saffron sticks
7) 3-4 types of fruits and half bowl pomegranate.

***Method:
• First make curd from milk.
• Then take one piece of muslin type cloth  and pour all curd on it.  Hang it for about 10-12 hours so as to drain all the water from curd.  This curd is called Chakka.  Put this chakka in a sieve and by hand rotate it firmly so that it becomes smooth and filters down.
•. Chop fruits in small pieces
• Now take sugar, chopped fruits, Cardamom powder, nutmeg powder, one cup of milk and mix it well.  Put it in the fridge for one hour.
• Add Saffron sticks and pomegranate and  serve.

फ्रुटखंड हा खरं तर अगदी अलिकडच्या काळातला पदार्थ. श्रीखंडासारखा काही त्याला पूर्व इतिहास नाही. श्रीखंड तसे पारंपारिक पदार्थात येते.  महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेले हे श्रीखंड....याला नैवेद्याच्या पानातही मानाचे स्थान आहे.  चक्का हा घरीही करता येतो. मलईयुक्त दही पातळ फडक्यात ठेवून १०-१२ तास टांगुण ठेवावे म्हणजे त्यातील पाणी पूर्ण निथळले की चक्का तयार होईल.  याला इंग्रजीत hung curd म्हणतात. पण आता गृहिणींना वेळेअभावी घरी चक्का करणे शक्य नसते तेव्हा तयार चक्काही मिठाईच्या दुकानातून आणता येतो.  खरं तर विकतच्या तयार श्रीखंडापेक्षा घरी चक्का आणून श्रीखंड करण्याची मजा काही औरच!
श्रीखंडाचेच भावंडं म्हणजे आम्रखंड....जे आंब्याच्या सिझनमध्ये आमरस घालून व आंब्याच्या फोडी घालून करता येते.  तयाचा केशरी रंग आणि चव केवळ अप्रतिम!
कालांतराने श्रीखंडाच्या मूळ रुपाला मेक ओव्हर करुन आलेल्या आम्रखंडाची पुढची आवरूती म्हणजे फ्रुटखंड!! जर आंबा घालू शकतो तर इतरही सिझनल फळं घालून बघायला काय हरकत आहे?...या विचाराने हे फ्रुटखंड तयार झाले असावे!!आणि नंतर मोठ्या मोठ्या ब्रँडनेही हे फ्रुटखंड बाजारात आणले आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय ही झाले.पण स्वतः करण्याची गंमत आपल्यालाच आनंद देते.सगळ्या फळांचा निरनिराळा स्वाद यात उतरल्यामुळे खाताना खूपच मस्त लागते. विशेषतः उन्हाळ्यात तर हे थंड फ्रुटखंड जिव्हातृप्तीचा विशेष आनंद देते!
वरील घटक पदार्थात सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य तयार ठेवावे. आंबटपणास कमी असलेला चांगल्या प्रतीचा चक्का व फळे घ्यावी.

Follow me on Instagram and Facebook
A-1 Sugras Recipes
Amita Date
amita_date food blog

show more

Share/Embed