दोन विलक्षण पक्षी सातभाई आणि खाटीक | Babbler | Shrike
Rupak Sane Rupak Sane
8.21K subscribers
34,126 views
1.1K

 Published On Sep 13, 2024

आपल्या आजूबाजूला अनेक पक्षी सतत दिसत असतात.
त्यात दिसणारे काही पक्षी विलक्षण असतात.
त्यातल्याचा काही पक्ष्याची ही रंजक माहिती आपण पाहणार आहोत.
सातभाई म्हणजे इंग्रजीत याला Babbler म्हणतात. याच शास्त्रीय नाव टरडॉइड्स माल्कोमी
हे नेहमीच सहा-सातच्या समूहाने राहतात. म्हणून त्यांना ‘सातभाई’ हे नाव पडले आहे.

भारतात सातभाई पक्ष्याच्या सात जाती आढळून येतात;
१) छोटा सातभाई : (टरडॉयडीस कॉडेटस; कॉमन बॅब्लर).
(२) बडा सातभाई : (टरडॉयडीस स्ट्रायटस; जंगल बॅब्लर).
(३) मोठा राखाडी सातभाई : (टरडॉयडीस माल्कोमी; लार्ज ग्रे बॅब्लर).
(४) लालसर तपकिरी सातभाई : (टरडॉयडीस सुब्रुफा; रुफस बॅब्लर).
(५) रेखीत/पट्टेरी सातभाई : (टरडॉयडीस अर्लाई; स्ट्राएटेड बॅब्लर).
(६) निमुळत्या चोचीचा सातभाई : (टरडॉयडीस लाँगिरॉस्ट्रिस; स्लेन्डर बिल्ड बॅब्लर).
(७) पिवळ्या चोचीचा सातभाई : (टरडॉयडीस अफिनिस; यलो बिल्ड बॅब्लर).

सातभाई भारतात सर्वत्र आढळतात. सामान्यपणे हे पक्षी मध्यम आकाराचे, फिकट तपकिरी रंगाचे असतात. कोरड्या मैदानी प्रदेशात तसेच खुरट्या गवताच्या प्रदेशात ते वावरतात;
ते सतत खूप कलकलाट करतात आणि झाडाझुडपांच्या खाली जमिनीवरील माती, पालापाचोळा विस्कटून अन्न शोधत असतात. यावेळी काही सातभाई झुडपांच्या शेंड्यावर बसून टेहळणी करतात. शत्रूची चाहूल लागताच ते जवळच्या झुडपात/गवतात लपून बसतात. जमिनीवर वावरताना, बहुधा शेपटी उभी करून ते वावरतात. कीटक, लहान फळे हे त्यांचे मुख्य अन्न आहे. एका ठिकाणी अन्न टिपून झाल्यानंतर एकामागून एक असे समूहातील सर्वजण उडून दुसऱ्या जागी जातात. त्यांना फार लांब उडता येत नाही. उडताना ते जोराने पंखांची फडफड करतात पण थोडेच दूर जाऊन पंख पसरून हवेतून संथपणे तरंगत जातात.
सातभाई पक्ष्याचा विणीचा हंगाम मार्च–मे आणि जुलै–सप्टेंबर असा वर्षातून दोनदा असतो.
प्रजनन काळात काही प्रौढ सातभाई समूहातील अन्य प्रौढ पक्ष्यांची मानेवरची, डोक्यावरची पिसे नीट करताना दिसतात.
घरट काटेरी झुडपात किंवा दाट गवतात, सहसा कोणाला दिसणार नाही, अशा जागी बांधतात. घरटे वाटीच्या आकाराचे असून मुळ्या, काड्या यांच्यापासून ते बनलेले असते.
अन्न शोधताना त्यांचा एकसारखा कर्कश आवाज चालू असतो. ते एकमेकांशी लढतात, एकमेकांचा पाठलाग करतात. लहान थव्यांमध्ये ते सहकारी वृत्तीने एकत्र राहतात. काही वेळा मतभेद झाल्यासारखे एकमेकात झुंजत असतात.
याच्यावर दुसऱ्या एखाद्या पक्ष्याने हल्ला केल्यास ते सर्व एकत्र येऊन त्या पक्ष्याला हाकलून देतात किंवा काही वेळा निपचित पडून मेल्याचे सोंग घेतात.
चातक आणि पावशा यांसारखे पक्षी सातभाईच्या घरट्यात अंडी घालतात ही एक अद्भुत गोष्ट आहे.

महाराष्ट्रातील काही ठिकाणी यांना कोंघी या नावाने ओळखतात. तर काही ठिकाणी सात भाऊ जसे भांडतात आणि नंतर एकत्र होतात तसें हे असतात म्हणून ते सातभाई अशी रंजक गोष्ट सांगितली जाते.
तसेच हे पक्षीजगतातलें 'साथ-साथ' राहणारे हे 'सातभाई' शहारच्या थोडं बाहेर गेलं तर आपल्याला नक्की भेटतात.
----------------------------------------------------------------------------------
खाटिक किंवा कसाई
हा पक्षी म्हजे अत्यंत हुशार नये विलक्षण आहे.
याचा शास्त्रीय नाव - लॅनियस शॅक Lanius schach.
हा एक छोटा मांसाहारी पक्षी आहे.
याला इंग्लिशमध्ये श्राइक असे नाव आहे.
जगभरात याच्या अनेक जाती आहेत.
आपल्याकडे महाराष्ट्रात त्याचे असे काही प्रकार आहेत
तपकिरी खाटिक
तिबेट खाटिक
पिंगल खाटिक
हा पक्षी बुलबुलापेक्षा मोठा पण साळुंकीपेक्षा लहान असतो.
नर आणि मादी सारखीच दिसतात. हे बर्या चदा एक एकटेच हिंडत असतात.
एखाद्या काटेरी झाडाच्या पुढे आलेल्या फांदीवर किंवा झुडपावर निश्चल बसून हा भक्ष्याची टेहळणी करतो.
एखादा लहान प्राणी किंवा किडा दिसण्याचाच अवकाश,
तो झडप घालून त्याला पकडतो व झाडावर नेऊन त्याचे तुकडे करून खातो.
टोळ, नाकतोडे, बेडूक, सरडे, लहान पक्षी, रानउंदरांची पिल्ले, हे या पक्ष्याचे भक्ष्य आहे.
ह्याची एक अद्भुत आणि हुशारीची गोष्ट म्हणजे त्याचे पोट भरल्यानंतर संधी मिळाली की गरजेपेक्षा जास्त शिकार करतो. असे गरजेपेक्षा जास्त शिकार केलेले प्राणी मारून तो एखाद्या काटेरी झाडावरील मोठ्या काट्याला ती शिकार टोचून ठेवतो आणि दुसरा पकडण्याची तयारी करतो. आणि लहर लागेल तेव्हा या प्राण्यांचे लचके तोडून खातो. यामुळेच याला खाटिक असे नाव दिले गेले आहे.
याचा भक्ष्य पकडण्याचा हा उद्योग दिवसभर चालू असतो.
याचा आवाज कर्कश असतो प्रजोत्पादनाच्या काळात मात्र तो मंजूळ सूर काढतो.
बर्याआचदा दुसऱ्या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजांची हा हुबेहुब नक्कलही तो करतो.
फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत प्रजोत्पादनाच्या काळात एखाद्या काटेरी फांदीच्या दुबेळक्यात किंवा झुडपावर काटक्या, गवत, चिंध्या वगैरेंजमा करून खोल वाटीच्या आकाराचे घरटे तो बांधतो. मादी दर खेपेला तीन ते सहा अंडी घालते, ती फिक्कट हिरव्या रंगाची असून त्यांवर तपकिरी ठिपके असतात.

जंगलाच्या सरहद्दीचा भाग, जंगलतोड केलेला भाग, झुडपी जंगले, विरळ झुडपे आणि लहान झाडे असलेली कुरणे. अशा प्रदेशात हा दिसतो. बर्या चदा हा बाभळीच्या झाडावर हा राहतो.
खाटिक पक्षाला दुसरे मराठी नाव म्हणजे गांधारी. जणू काही गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधली आहे असे वाटते म्हणून हे नाव असावे. या पक्ष्याच्या आजपर्यंत एकूण ३० जाती नोंदवल्या गेलया आहेत. अगदी क्वचित हा पक्षी बागेतह दिसतो.
उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान करणारे टोळ,आळया या कीटकांना हा खातो म्हणून पीक फस्त करणाऱ्या टोळधाडीपासून पिकांचे संरक्षण होते म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी त्याला मित्र मानतात. .

माझ्या चॅनलला subscribe, like, share करा.
मोबाईल - 9420444969
[email protected]
   / @rupaksane  

show more

Share/Embed