हे ढगांचे प्रकार तुम्हाला महिती आहेत का? | Types Of Cloud | ढगांची मनोरंजक माहिती
Rupak Sane Rupak Sane
8.21K subscribers
1,386 views
72

 Published On Jul 19, 2024

आपल्याला लहानपणी आईने लिहायला शिकवताना दाखवलेला ढ..ढ ढगाचा असतो. आकाशातल्या खूप दूर असणाऱ्या ढगाचा. आणि नंतर हळू हळू कुठल्या तरी वयात त्या ढगांकडे बघण्याच वेड लागते
नकळत गच्चीत, ग्यालरीत जाणे झाले की आकाशाकडे एक नजर जाते.
आणि पटकन कधी शब्द फुटतो अरे अरे बघा काय अफलातून आकार तयार झाला आहे ढगात. कधी ससा, तर कधी राक्षस, तर कधी पऱ्या, पक्षी अशी विविध मनोरूपे ढगात दिसू लागतात.
चांदोमामा आणि ढग यांचा पाठशिवणीचा खेळ तर कुठल्याही वयात मोहवतो.
कधी चंद्र मेघातून डोकावताना, एखादी सुरेल तान प्रेम व्यक्त करते,

महाकवी कालिदासाने मेघदूतात या मेघाला नायक केले आहे.

अशा या मेघांच्या गोष्टीतून मानवी भावभावनांचे अंकुर फुटलेले आहेत.

पण यांना मेघ हा शब्द जास्त रंजक आहे म्हणून त्याना आपण मेघच म्हणू.
जेव्हा वातावरणातले जलकण आणि हिमकण सूक्ष्म वजन विरहित अवस्थेत जमा होतात आणि जमिनीवरून आकाशात जाणार्याे वार्यानच्या जोरदार प्रवाहामुळे वातावरणात तरंगत राहतात. तेच हे मेघ.

1 #Cirrus सिरस ढग - मराठीत त्याला तंतुमेघ म्हटलय .
2 #Cirro-Stratus - सिरोस्ट्रॅटस मेघ – तंतुस्तर मेघ
3 #Cirrocumulus - सिरोक्यूम्युलस मेघ - तंतुराशिमेघ
4 #Alto-stratus - अल्टो स्ट्रॅटस मेघ - मध्यस्तरी मेघ
5 #Alto Cumulus - अल्टो क्युमुलस मेघ - मध्यराशिमेघ
6 #Strato cumulus - स्ट्रॅटोक्युमुलस मेघ - स्तराशिमेघ
7 #Strutus - स्ट्रॅटस मेघ - स्तरमेघ
8 #Nimbostratus - निम्बोस्ट्रॅटस् मेघ - वर्षास्तरी मेघ
9 #Cumulus - क्युम्युलस मेघ – राशिमेघ
10 #Cumulonimbus - क्युम्युलोनिम्बस मेघ - गर्जन्मेघ

तर मित्रांनो अभ्यासकांच्या भाषेत अश्या ह्या मेघांच्या अभ्यासला ‘नेफॉलोजी’ म्हणलं जातं .
मानवी मनाची गम्मतही मेघांसारखीच आहे,
हे मेघ कुणाला सूर्यास्ताची मजा देतात तर एखाद्याला भावुक करून जातात.
काळे मेघ पाहून मोर आणि बळीराजा सुखावतो.
तर कधी कधी हाच मेघ फुटून हाःहाकार करतो. होत्याचे नव्हते करतो.
असे हे ढग माणसाच्या आयुष्याच्या कुठल्या तरी आकाशात येऊन जात असतात.
म्हणून आजपासूनच नक्की घरा बाहेर पडताना वर बघा... बघा ढग आजच्या दिवसाबद्दल काय सांगतात ते...
असं हे आपलं आणि ढगांचे नाते उलगडून पाहणं म्हणजेच अंगांनापासून आकाशापर्यंतचा निसर्ग अंनुभवणे.
आतापर्यंत आपण पाहिलेले हे ढगांचे प्रकार आणि त्यांची माहिती यांचा शास्त्रीय अभ्यास अतिशय गुंतागुंतीचा आणि अवघड आहे.
ह्या प्रकारांमध्ये अजून अनेक उपगटही असतात.
अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे ढग एकत्रितही दिसत असतात.
त्यामुळे ह्या व्हीडिओतली माहिती परिपूर्ण नाही.
हा विडिओ केवळ निसर्गातील विविधता आणि त्यामागील विज्ञानकडे मनोरंजकपणे पाहणे आणि त्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने केलेला आहे.

मोबाईल - 9420444969
[email protected]
   / @rupaksane  

show more

Share/Embed