कांद्याची पुरी | kanda puri recipe by Bhagya kitchen
Bhagya Kitchen Bhagya Kitchen
16.2K subscribers
256 views
0

 Published On May 19, 2023

कांद्याची पुरी | kanda puri recipe by Bhagya kitchen #puri #newrecipe


Follow us on Instagram-
  / bhagya.kitchen  


साहित्य:-

1) कांदे- चार ते पाच
2) हिरव्या मिरच्या- दहा ते पंधरा
3) लसूण पाकळ्या- 15 ते 20
4) कोथिंबीर- अर्धी जुडी
5) जिरे- एक चमचा
6) तीळ- दोन चमचे
7) गव्हाचे पीठ- आठ ते नऊ वाटी
8) तेल- तळण्याइतके
9) मीठ- चवीनुसार
10) आलं- दोन ते तीन इंच

कृती:-
प्रथम कांदा मिक्सरला फिरवून घ्या, कांदा फिरवत असताना त्यामध्ये हिरवी मिरची, आलं ,आणि कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घ्या. कांद्याची पेस्ट केल्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून घ्या . पीठ घालत असताना त्यामध्ये तीळ ,जिरे आणि मीठ घालून कणकेचा गोळा घट्ट मळून घ्या. आणि एक ते अर्धा तास मळलेला गोळा भिजू द्या, त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या, पुऱ्या लाटताना जर तुम्हाला आवडत असेल तर वरून तीळ लावा आणि तळून घ्या. अतिशय सुंदर अशा कांद्याच्या पुऱ्या टोमॅटो सॉस बरोबर खूप सुंदर लागतात.

-----------🅂🅄🄱🅂🄲🅁🄸🄱🄴-----------

🔔 If you liked the video make sure to give a like and don't forgot to subscribe my channel. Confirm that you have the bell turned on, so you will definitely not miss any of our videos!

🆃🅷🅰🅽🅺🆂 🅵🅾🆁 🆆🅰🆃🅲🅷🅸🅽🅶

show more

Share/Embed