Advetures malshej ghat and kalu waterfall ( मालशेज घाट वाट , काळू धबधबा )
Travel with Manish Travel with Manish
103 subscribers
136 views
18

 Published On Sep 25, 2024

😊🙏🏻 नमस्कार 🙏🏻😊
आज आपण प्रवास करूया माळशेज घाट आणि काळू धबधबा ...
चला तर मग एक निसर्ग रम्य थरारक सफर वर .
माळशेज घाट हा जुना व्यापारी मार्ग . ही आहे एक घाट वाट जी कल्याण आणि अहमदनगर ला जोडते . माळशेज घाट निसर्गाने परिपूर्ण आहे . ह्याच घाटात आढळतो काळू धबधबा .
काळू धबधबा ह्या परिसरातील सर्वात मोठा धबधबा . काळू धबधबा पाच टप्प्यात येतो . सर्व पाच टप्पे एकावेळेस दिसत नाही .
हरिश्चंद्र गड पर्वत रांगेतून हा खिरेश्वर मार्ग वाहत येतो.
काळू धबधब्याच्या बाजूला वाहनारा अजून एक धबधबा आहे . ह्याला स्थानिक लोक माहुली धबधबा म्हणतात . हे दोघं धबधबे एकत्र येऊन काळू नदी बनते.
काळू धबधबा वरून बघण्यासाठी खिरेश्र्वर या ठिकाणी जावे लागते .
काळू धबधब्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी थीबटी गावातून जावे लागते .

आम्ही दुपारी तीन च्या सुमारास कार ने प्रवास सुरू केला . पनवेल - कर्जत - धसई - कल्याण नगर महामार्ग असा हा प्रवास . प्रवासात सह्याद्रीच्या पर्वत रांगा हिरव्या गार दिसत होत्या . बघावं तिथे निसर्गाची हिरवळ पसरलेली . वातावरणात गारवा होता . चार पाच तास प्रवास करून सुरू झाला नवा माळशेज घाट. अंधार असल्याने माळशेज घाटाची मज्जा अनुभवता आली नाही . रात्री सुमारे ८ वाजता आम्ही घाटाच्या माथ्यावर येऊन पोहचलो . एमटीडीसी चे रिसॉर्ट खूपच खर्चिक असल्याने , महामार्गाला लागून असलेल्या एका छोट्या टपरी च्या बाजूला कार लावून . तिथे घरून आणलेला आहार केला. कारच्या बाजूला टेन्ट लावून हवेतील गारव्याचा आनंद घेत रात्री झोपलो.
सकाळी लवकर उठून प्रातः विधी आपटून आणि थोडी पोट पूजा करून आम्ही जुना माळशेज घाट उतरायला सुरुवात केली. काही अंतर चालून गेल्यावर थोड्याफार पायऱ्या लागल्या . पायऱ्या उतरून खाली आल्यावर लगेच जंगल वाट सुरू झाली. कारवीचे घनदाट असे जंगल. कारवी बऱ्या पैकी मोठी झाल्याने खालील पाऊल वाट गुडूप होत होती . त्या मुळे प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे लागत होते . मधेच एखादा काटा शरीरावर घात करुन परीक्षा बघत होता . यातून बाचावत नाही तर पाया खाली असलेले गुळगुळीत खडक घसरगुंडी चा खेळ खेळत होते . मजल दर मजल पाऊल सांभाळत आम्ही खाली उतरत होतो . काही अंतर चालून आल्यावर निसर्गाच्या कुशीत मनमोहक असा नजारा दृष्टीत आला . आजूबाजूचा निसर्ग खूपच मनमोहक होता . ह्याच अश्याच ठिकाण च्या शोधत प्रवास सुरू असतो .
त्या ठिकाणी काण्या कपारीतून वाहणाऱ्या असंख्य जलप्रपात एकत्र येऊन त्यांनी धबधब्याचे स्वरूप घेतलेले. हा वाहणारा ८ फूट लांबीचा धबधबा खूपच आकर्षक होता . जणू पाणी हे दुग्ध होऊन वाहत होते . पडणारे पाणी एखाद्या पांढऱ्या शुभ्र रंगाला सुद्धा लाजवेल इतके शुभ्र होते. आजूबाजूला हिरवी गार झाडांची वस्ती . हवेत गारवा आणि त्यावर डोलणारे हिरवे गार गवत ,पक्षांचा सुमधुर ध्वनी , ढगांचा अंगाला न जाणवणारा स्पर्श , ह्या सगळ्या निसर्गाने जीवनात काही क्षणासाठी विराम लावलेला . हे बघितल्यावर अजून काय बघावे असा तो क्षण होता . काही काळ तिथे थांबून . जड मनाने पुढचा प्रवास सुरू केला . वाहणारे हे पाणी थेट काळू नदीला जाऊन मिळणार होते . ह्याचा पाण्याच्या कडे कडेने प्रवास सुरू झाला . निसरडे खडक त्यावरून वाहणारे पाणी आणि खडकावर असलेली शेवाळ उतरणीचा प्रवास कठीण करत होते . जरा जरी चूक झाली तर थेट दरीत कोसळण्याची वेळ आली असती . सांभाळत पाऊल टाकत , हातांचा सुद्धा वापर करत आम्ही मार्गस्थ होत होतो . थोड पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एका पाषाणात कोरलेली सुबक अशी गणेशाची मूर्ती दिसली . बाप्पा चे दर्शन घेऊन आम्ही खाली उतरत होतो . थोड्याच पुढे गेल्यावर दोन पाण्याचे टाके लागले . इथून मात्र पुन्हा जंगल वाट सुरु झाली . आता सोबत वाहणारे पाणी दृष्टी आड गेले . कारवी जणू अंगाशी खेळ खेळत होती . अधून मधून चक्क वाकून वाट काढावी लागत होती . थोड पुढे आल्यावर एक मोठी पाऊल वाट लागली आणि काही वेळेत आम्ही काळू नदीच्या जवळ येऊन पोहचलो . एक वाट थिबटी गाव कडे जात होती आणि उजव्या बाजूची वाट काळू धबधबा कडे . आम्ही धबधब्या कडे जाणारी वाट पकडून पुढे मार्गस्थ झालो . इथून मात्र कारवी ने आमची साथ सोडली . आणि दृष्टी आले त्या पर्वत रांगा . पुढे खोल काळू नदीचे पात्र दृष्टीस आले. नदीच्या कडे कडे ने वाट काढत प्रवास सुरू ठेवला . काळू धबधबा आणि माहुली धबधबा दृष्टीस आले आणि घेतलेल्या मेहनतीचं फळ मिळाल्याचा आनंद झाला . थोड चालून आले आणि समोर एक आव्हान उभे राहिले, नदी पार करण्याचे . नदीचा प्रवाह खूप होता . पाण्याचा जोर आणि आवाज कर्कश होता . स्वतःला सावरत अगदी सांभाळत एकमेकांना सोबत घेऊन दोन ठिकाणी नदी पार केली . नदीच्या डाव्या बाजूने एक वाट एका डोंगरावर घेऊन जात होती आणि तिथून दृष्टीत येत होता काळू धबधबा . आधी आम्ही वर जाऊन काळू धबधब्याचे दर्शन घेतले .
सह्याद्रीच्या ह्या पर्वत रांगेतून वाहणारे हे पाणी कड्या वरून खाली उडी मारत होते . निसर्ग राजा आपले जल वैभव येथे ओतत होता . डोंगरातील कातळ कडे कापत खळखळत वाहणारे हे पाणी आमच्या सारख्या भटक्यांना वेड लावत होते . दुरून पाहताना शेकडो फुटांवरून खाली कोसळणारे फेसाळ पाण्याचा प्रवाह आणि त्याचा कर्कश धीरगंभीर आवाज हे सारे काही अचाट विस्मरणीय होते . काही क्षण या ठिकाणी थांबून आम्ही खाली उतरून थेट धबधब्याच्या खाली जाण्याचे ठरवले . पाण्याचा प्रवाह जोरात होता पण कडे कडे ने आम्ही थेट काळू धबधब्याचा दुसरा टप्पा गाढला . ओले निसरडे खडक जोरदार पाण्याचा प्रवाह आणि अगणित पाण्याचे तुषार अंगावर खेळत होते . पूर्ण पने भिजून, आयुष्यात पुन्हा मन तृप्ती चा अनुभव आला. काही क्षण इथे घालवून पुन्हा कडे कडे ने आम्ही नदी पार करून थेट थिबटी गावाचा रस्ता गाठला. निसर्ग रम्य निथळ खळखळ गार रोचक आणि थरारक असा अनुभव गाठीशी घेऊन प्रवास सुरू ठेवला . वाटेत आजूबाजूला हरिश्चंद्रगड , रोहिदास दुर्ग , मोरोशीचा भैरव गड , आदराई चे पठार , ठीक ठिकाणी कोसळणारे धबधबे , खळखळ वाहणारे पाणी सर्वत्र दृष्टीस येत होते .

😊🙏🏻धन्यवाद 🙏🏻😊

show more

Share/Embed