Malshej Ghat Bike Ride || धुक्यात हरवलेलं माळशेज || August 2022 | Stray On Wheels
Stray On Wheels Stray On Wheels
1.4K subscribers
1,820 views
68

 Published On Aug 27, 2022

पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील काही घाटापैकी एक असा माळशेज घाट. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.
माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.
पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा काळू धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते.

कसे जावे ?

मुंबईपासून 128 तर पुण्याहून माळशेज चे अंतर 118 किलोमीटर इतके आहे

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते.

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाटाकडे जाता येते.

महाराष्ट्राच्या इतर भागातून येणारया लोकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ हाच मुख्य मार्ग असून मराठवाडा, विदर्भातील लोक याच मार्गाने माळशेज घाटात येतात.

ट्रेन ने यायचे झाल्यास जवळचे रेल्वे स्थानक कल्याण असून तिथून एस टी ने माळशेज ला येऊ शकतात.

:::::::::: आसपासची पाहण्यासारखी ठिकाणे ::::::::::

नाणेघाट
मोरोशीचा भैरवगड
काळू धबधबा
जीवधन किल्ला
शिवनेरी किल्ला
हडसर किल्ला
एम टी डी सी रिसॉर्ट

:::::::::: People also ask :::::::::::

Can we visit Malshej Ghat now?
How do I travel to Malshej Ghat?
What is special in Malshej Ghat?
How can I go to Malshej Ghat from Mumbai?
Where is malshej located?
How is road from Malshej Ghat to Mumbai?
Is Naneghat open for tourists?
Is Malshej Ghat safe to drive?
How can I go to Malshej Ghat by train?


::::::::::::::: Music used :::::::::::::::

Channel name : Bensound
Channel Link :    / bensoundmusic  

::::::::::::::: Devil Horns Purchase link :::::::::::::::

https://amzn.eu/d/82VKxRJ

show more

Share/Embed