पावसाळ्यातील गावचं रम्य वातावरण😍|रात्रीच्या जेवणात सुकट पावट्याची भाजी- Ambavali, Mandangad (Konkan)
S FOR SATISH S FOR SATISH
383K subscribers
294,656 views
7.1K

 Published On Jun 25, 2021

पावसाळ्यातील गावचं रम्य वातावरण 😍 | रात्रीच्या जेवणात सुकट पावट्याची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan) पावसाळ्यात गावच वातावरण पाहण्यासारखं असतं. सगळा परिसर हिरवागार झालेला असतो. पाऊस कधीही येतो. सध्या गावी मुसळधार पाऊस लागत आहे. शेतीला पोषक असं वातावरण झालं आहे. पावसाच्या या रम्य वातावरणात जाम भारी वाटतं. आमच्या घरी रात्रीला पावट्याची भाजी बनवली होती. पावट्याच्या भाजीत सुकट घालून जाम भारी भाजी तयार होते. बाजारातून मी पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या. वांगं बटाटा आणि कोलीम सुकट घालून ही सुकी भाजी तयार केली. वर्षाच्या हाताला चव एकदम भारी आहे. वर्षा छान छान जेवण तयार करते. दुपारी आम्ही शेतावर गेलो होतो. प्रांजु आई पण शेतावर आले होते. प्रांजु मामाच्या गावी तिकडेच राहिली. प्रदनु पाऊस आल्यावर जाम खुश होतो. पाऊस पदुला खूप आवडतो. पाऊस आला की जाम नाचतो. आमच्या घराच्या मागचा वहाळ जोरात वाहत होता. पाऊस दुपारपासून खूप लागत होता. पावसाळ्यात घरी गरमागरम जेवण खायला मजा येते. वर्षाने तिची आवडती आंबट गोड डाळ तयार केली. आजकाल आम्हाला सर्वांना ही गोडी डाळ आवडायला लागलेय. सोबत रात्री तांदळाच्या भाकऱ्या आणि भात होता. आम्ही दिवसभर काम करून आल्यावर रात्री भूक लागली होती. सर्वजण आम्ही एकत्र पंगतीने जेवायला बसलो. पावट्याची भाजी जाम भारी झाली होती. आंबट गोड डाळ सुद्धा भारी झाली होती. तुम्हाला या व्हिडिओमध्ये गावचं पावसाळ्यातील रम्य वातावरण दाखवलं आहे. पाऊस येतो तेव्हा कसं वातावरण असतं ते दाखवलं आहे. पावट्याची भाजी आणि अंबड गोड डाळ दाखवली आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PavtyachiBhaji #PavsalyatilKokan
#SukatPavtyachiBhaji
#sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

show more

Share/Embed