करवंदी नाळ आणि पायमोडी घाट | घाटवाटा ट्रेक | Karvandi Naal & Paaymodi Ghat | Ghatvata Trek
Subodh Hattarki Subodh Hattarki
3.15K subscribers
2,899 views
121

 Published On Dec 19, 2021

करवंदी नाळ आणि पायमोडी घाट.

प्राचीन काळात कोकणातून घाटावर/देशावर जाण्यासाठी तसेच दळणवळणसाठी सह्याद्रीतील अश्याच घाटवाटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. छत्रपती शिवरायांच्या काळात स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी सह्याद्रीतील अश्या घाटवाटा मोठ्या कामी आल्या.

खोपोली - पाली रस्त्यालगत मुंबईपासून साधारण १२० किमी अंतरावर मृगगडाच्या पायथ्याशी भेलीव गाव आहे. शनिवारी पहाटे या गावात बाईक पार्क करून शेजारच्या फल्याण गावातून आम्ही करवंदी घाटमार्गे ट्रेक सुरू केला. वाटेचा अंदाज असल्याने आम्ही न चुकता ट्रेक पूर्ण करू शकलो, तरी गावातून वाटाड्या/गाईड सोबत नेलेला बरा. चारपाच तासांनी आम्ही लोणावळ्यातील लायन्स पॉईंट जवळ पोहचलो. तिथून दोन किलोमीटर वर असणाऱ्या शिवलिंग पॉईंट जवळून पायमोडी घाटाने खाली उतरत आम्ही सूर्यास्तावेळी भेलीव गावात पोहचून मुक्काम केला. सोबत चार लिटर पाणी,टेंट, जेवणाचे साहित्य, सेफ्टीचे साहित्य जरुर ठेवावे, वेळप्रसंगी जंगलात मुक्काम करावा लागू शकतो.

सहभाग : पुष्कर बापट आणि सुबोध हत्तरकी

Video Recording : Pushkar Bapat
Editing : Subodh Hattarki
Music : Drifting - unicorn heads

show more

Share/Embed