Raosaheb Danve यांना विधानसभेसाठी भाजपने संयोजकपद का दिलं ?शहांनी कोणता डाव खेळला ?
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
92,937 views
1.2K

 Published On Sep 1, 2024

#BolBhidu #RaosahebDanve #BJPVidhanSabha2024

राजकारणात भल्याभल्यांना चकवा देणारं व्यक्तीमत्व म्हणून रावसाहेब दानवे यांची महाराष्ट्राला ओळख आहे. सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या दानवे यांचा राजकीय आलेख कायमच चढता राहिलाय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव झाला होता. पण आता भाजपनं त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिलीय. त्यांची भाजपच्या निवडणूक संयोजकपदी नियुक्ती करण्यात आलीय. शनिवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत दानवेंकडे विधानसभा निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली.

या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. आता निवडणुकीसाठी भाजपाचे राज्याचे संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब दानवे पाहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दानवेंना एवढी मोठी जबाबदारी देण्यावरून आता विविध चर्चांना उधाण आलंय. लोकसभा निवडणुकीत दानवेंचा एक लाखाहून अधिकच्या मतांनी पराभव झाला. अशात भाजपनं त्यांना एवढी मोठी जबाबदारी का दिली? यामागे नक्की काय कारणं आहे? भाजपचा विधानसभेचा प्लॅन काय असू शकतो? पाहुयात या व्हिडीओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed