Haryana मध्ये BJP ने जाट फॅक्टर संपवला तसा महाराष्ट्रात मराठा फॅक्टर संपवू शकेल ?
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
25,067 views
958

 Published On Oct 10, 2024

#BolBhidu #HaryanaElection #manojjarangepatil

Timestamps
0:00 - सुरूवात
1:40 - मराठा आणि जाट समाजाच्या आकडेवारीचा अंदाज आणि महत्त्व
3:41 - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला काऊंटर करणं भाजपला जमेल का ?
4:44 - दलित फॅक्टर आणि मुस्लिम फॅक्टर
8:05 - ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपची काय स्ट्रॅटेजी असु शकते ?
9:08 - मायक्रो ओबीसी समाजाचं महत्त्व
9:40 - ओबीसी समाजाच्या ध्रुवीकरणासाठी महत्वाचे ठरणारे फॅक्टर
12:24 - मराठा फॅक्टर काऊंटर करण्यासाठी भाजपला येणाऱ्या मर्यादा

हरियाणात जाट विरुद्ध नॉन जाट किंवा जाट विरुद्ध ओबीसी अशाप्रकारचं राजकारण होतं. साधारण 25 ते 28 टक्के असणाऱ्या जाट समाजाचं आणि 30 टक्क्यांहून अधिक असणाऱ्या ओबीसी समाजाचं ध्रूवीकरण झालं. जाट समाजाचा कल कॉंग्रेसच्या बाजूने होता तर ओबीसी समाजाचा कल भाजपच्या बाजूने. या राजकारणात जाट समाजासोबत दलित समाज येईल अस बोललं गेलं पण कॉंग्रेसच्या ते पथ्यावर पडलं नाही, याऊलट जाट समाजाच्या विरोधात ओबीसी, मुस्लीम आणि दलित मतांची सांगड घालण्यात भाजप यशस्वी ठरली. जातीच्या राजकारणात भाजपचा पराभव होतो असं बोललं जात असताना भाजपने योग्य बेरजा मारून सामाजिक,आर्थिक,राजकीय क्षेत्रावर मक्तेदारी असणाऱ्या जाट समाजाच्या राजकारणाला काऊंटर केलं…

आत्ता मुद्दा आहे तो महाराष्ट्राचा. हरियाणात जाट त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठा. दोन्ही समाज मुख्यधारेतला. राजकारणासह अर्थकारणावर गावगाड्यावर या समाजाचं वर्चस्व, मात्र गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी जाट आणि मराठा दोन्ही समाज आक्रमक. गेल्या दहा वर्षापासून हरियाणा आणि महाराष्ट्रात देखील भाजप सत्तेत त्यामुळे या मुख्यधारेतल्या दोन्ही जातींचा भाजपवर विशेष राग. त्यातच हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात भाजपचा मुळ मतदार हा ओबीसी… अशा वेळी जाट समाजाची मक्तेदारी दूर करत भाजपने अशक्य वाटणारं मैदान मारलं. साहजिक हे महाराष्ट्रात होईल का? झालं तर भाजपची स्ट्रॅटेजी काय असेल आणि नॉन मराठा एलायन्स करण्यात महाराष्ट्रात कोणत्या मर्यादा भाजपला येवू शकतील समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed