खड्ड्यांनी लावली वाट भाग 1 : घनश्याम दरोडे आणि विशाखा सुभेदारसोबत खड्ड्यांचा फेरफटका
ABP MAJHA ABP MAJHA
14.1M subscribers
3,340,084 views
12K

 Published On Jul 28, 2018

नेमेचि येतो पावसाळा, अशी मराठीत एक उक्ती आहे. त्या पावसाळ्याला जोडूनच आपल्या मुंबईत अगदी नेमानं सुरू होतो तो खड्ड्यांचा मोसम. मुंबईतल्या रस्त्यांना खड्डे पडले की, विरोधी पक्षांची आंदोलनं, निदर्शनं हे सारं काही नेमानंच होतं. पण त्यातून सुधारतील ते सत्ताधारी कसले? आता तुम्हीच पाहाना.. यंदा पाऊस सुरू होऊन दोन महिने उलटायला आले. पण मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याची तसदी अजूनही घेण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांनी याची तक्रार करायची ठरवलं, तरी नेमकी कुणाकडे करायची हा प्रश्न कायम असतो. कारण आपल्या घरासमोरच्या रस्त्याची देखभाल मुंबई महापालिका, पीडब्ल्यूडी की,एमएमआरडीए यापैकी कोणत्या एजन्सीकडे याची सर्वसामान्यांना कल्पना नसते. मुंबईकराच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि नगरच्या श्रीगोंद्याचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे घेऊन आलेत एक खास कार्यक्रम... खड्ड्यांनी लावली वाट.

show more

Share/Embed