सांगली | मालकाविना चालणारी बैल गाडी,"सोन्या बैलाची" पंचक्रोशीत चर्चा | Golden bull | सोन्या बैल
LOKSANDESH NEWS LOKSANDESH NEWS
51K subscribers
4,378,934 views
18K

 Published On Jun 14, 2019

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील काळमवाडी हे साडे चार हजार लोकसंख्येचे गांव आहे... याच गावात शिवाजी साळुंखे हे शेतकरी राहतात.. त्यांना चार मुले आहेत.. आणि शेती 10 एकर आहे.. त्याच्या कडे गाई आणि म्हैस अश्या ब्बल 40 जनावरे आहेत..

शिवाजी साळुंखे यांच्या घरच्या देशी गाईचे सोन्या हा बैल झाला.. तो गेल्या 10 वरश्यापासून त्याच्या कडे आहे.. आपल्या मुला प्रमाणे ते सोन्याला जपतात.. तर सोन्या हा तसा पहिल्यापासूनच हुशार आहे.. तो कोणहल मारत नाही.. जे सांगितले जाईल ते तो ऐकत असतो.. पण शिवाजी हे वैरण गोळा करत असताना बैल आपोआप पुढे जायचा आणि एके दिवशी तो आपोआप दूध डेअरी वर गेला.. त्यावेळी पासून बैल हा विना मालकाचा दूध घालून येत आहे.. सोन्या हा तब्बल 7 ते 8 वर्ष झाले विना मालकाचा डेअरीला जात आहे..

सोन्या बैल हा सकाळी उठल्यावर शेताकडे जातो.. त्यानंतर तो दूध घेऊन तब्बल 3 किलो मीटर गावाकडे जातो.. त्याच्या गाडीत पाच कँन असतात त्यामध्ये 200 लिटर दुध असते.. विशेष म्हणजे हे दूध न सांडता तो जात असतो.. तर अगदी एका माणसा प्रमाणे रोडच्या कडेने जात असतो.. एखादी गाडी माघून आली की साईडला जातो.. आणि गावातून जाताना कुठे वळायचे आहे तेथे टर्न घेतो आणि डेअरी गाठतो..
सोन्याची वाट सर्व गावकरी पाहत असतात.. आणि जर सोन्याने गावात एन्ट्री केली की लोक सोन्या आला रे म्हणून त्याला कुटुहुलाने पाहतात.. आणि जर ज्या दिवशी सोन्या गावात गेला नाही तर सोन्या का आला नाही अशी चर्चा सतत गावात सुरू असते.. अगदी लहानपणापासून ते वयोवृद्ध लोक सोन्याची वाट पाहत असतात.. आणि त्याचा लळा या गावाला लागला आहे..

आमचा गावात दूध संकलन करण्यासाठी गेले 20 वर्ष दूध डेअरी आहे.. डेअरीत दूध घालण्यासाठी कोण्ही सायकल वरून तर कोण्ही चालत येत असते.. पण सोन्या बैल हा विना मालकाचा बैल गाडी घेऊन येतो.. तो गेल्या अनेक वरश्यापासून आमच्या डेअरीत येत आहे.. आम्ही रोज त्याची वाट पाहत असतो.. सोन्या आला की डेअरी पशी गर्दी जमते..


गावात सोन्या बैल आला की त्याचे फोटो काढण्यासाठी तरुण वर्ग गोळा होतात.. तसेच पै पावणे आले की सोन्याला विचारत असतात.. सोन्या बैल हा गावचा वैशिष्ट्य झाला आहे.. माणसाला जेवढे कळत नसेल तेवढे या जनावराला कळते. त्यामुळे सोन्याचे सगळ्यांना आचार्य वाटत आहे..

#SONYA_BAIL
#सोन्या_बैल
लोकसंदेश_न्यूज_सोन्याबैल

show more

Share/Embed