Buldhana| जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे उत्खननामध्ये पुरातत्व विभागाला भगवान विष्णूची मूर्ती सापडली.
Nirbhid Samrat Nirbhid Samrat
63 subscribers
7,548 views
66

 Published On Jun 22, 2024

Buldhana| जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे उत्खननामध्ये पुरातत्व विभागाला भगवान विष्णूची मूर्ती सापडली.

बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळी पुरातत्व विभागाकडून उत्खनन करण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी यादवकालीन शिवमंदिर आढळून आले त्यानंतर उत्खनन करत असताना भगवान विष्णू यांची शेषनागावर आराम करत असलेल्या मुद्रामध्ये आणि माता लक्ष्मी व ब्रह्मा वरच्या बाजूंनी समुद्रमंथनाची मुद्रा त्याचबरोबर हत्ती घोडा बैल व इतर देव देवतांची प्रतिमा असलेली सुंदर कलाकृती असलेली सुबक नक्षीकाम केली मूर्ती पुरातत्व विभागाला उत्खनन करत असताना आढळून आली आहे.

सिंदखेडराजा वासियांची शासनाकडे मागणी आहे की सदर
मूर्ती इतरत्र हलवू नये यासाठी रहिवाशांची खासदारांना निवेदन देत मागणी केली आहे.

आज खामगाव येथे जळगाव खान्देशच्या खासदार स्मिता वाघ, व राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांना निवेदन दिले.

येत्या दोन दिवसात पुर्णपणे बाहेर येणार आहे, पुरातत्त्व विभाग हि मूर्ती सिंदखेड राजा येथून उचलून नागपुरला नेणार आहे, आम्हा शहरवासीयांची विनंती आहे कि हि मुर्ती मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे वस्तूसंग्रहालयात कायमस्वरूपी ठेवण्यात यावी हि विनंती.
तसेच सिंदखेडराजा शहरांमध्ये इतरही ऐतिहासिक स्थळांच्या उत्खनन करून तेथे ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यात यावा तसेच राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर एक फार मोठी बारव असल्याचे जुने जाणकार लोक सांगत आहे त्या समाधी समोर जे मंदिर सापडले आहे तिथून त्या बारवेत जाण्याचा रस्ता असल्याचे जुने जाणकार सांगतात त्यामुळे त्या परिसराचे अजून उत्खनन होऊन ऐतिहासिक काही गोष्टी सापडतात का याचा शोध घेण्यास यावा या करिता आपण संबधीत विभागास आपण पत्रव्यवहार करून किंवा भेट घेऊन येथील मूर्ती मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील वस्तुसंग्रहालयात कायम ठेवण्यात यावी, व अजून उत्खनन करून काही मिळते का याचा शोध घ्यावा या विषयी त्यांना निवेदन दिले. दोन्ही खासदारांनी तात्काळ त्या विषयी पत्र तयार करण्यास सांगितले व अधिवेशनात संसदेत संबधित मंत्र्यांची भेट घेऊन सदर विषयी चर्चा करू व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा सिंदखेड राजा मतदार संघ निवडणुक प्रमुख विनोद भाऊ वाघ, सिंदखेड राजा भाजप तालुकाध्यक्ष आत्माराम शेळके, सिंदखेड राजा भाजप शहराध्यक्ष ऍड संदीप मेहेत्रे यांनी निवेदन दिले.

show more

Share/Embed