पंढरीनाथ जिचा लेखकु जाहला ती संत जनाबाई I सदाशिव कामतकर I Sant Janabai I Sadashiv Kamatkar
Shabdaratne Shabdaratne
4.08K subscribers
13,821 views
238

 Published On Jan 26, 2022

संत जनाबाईंचा जन्म 1258 साली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा तर आईचे नाव करुंड असे होते. दोघेही विठ्ठल भक्त होते. संत जनाबाई या संत नामदेवांच्या घरीच कामे करायच्या. संत नामदेव हे त्यांचे पारमार्थिक गुरु ही होते त्यांच्या भक्तिमार्गांवरच जनाबाई चालत राहिल्या.
अतिशय सामान्यातली सामान्य अशी जनाबाईंची ओळख. पण आयुष्य भर मोलकरणीचं काम करणाऱ्या या दासीने असामान्य काम केलं ते म्हणजे सुमारे 350 अभंग लिहिले आणि स्वतः चं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून तेंव्हा आणि आजही जनाबाईंच्या ओव्या दळताना कांडताना स्त्रिया गातात. त्यांचे लोकप्रिय अभंग म्हणजे -
विठू माझा लेकुरवळा
पक्षी जाय दिगंतरा बालकासी आणि चारा
दळीता कांडीता तुज गाईन अनंता
ये गं ये गं विठाबाई
त्यांचा मृत्यू ई. स.1350 साली झाला.
त्यांच्या भक्तीच्या अनेक अख्यायिका आहेत त्यातीलच एक प्रसिद्ध अख्यायिका ऐकुयात.

Written & Narrated by: Sadashiv Kamatkar
Artwork by: Prashansa Hadkar

show more

Share/Embed