Lavvena he Shir Mate लववे ना हे शीर माते...
Amol Ghadge Amol Ghadge
89.8K subscribers
28,004 views
810

 Published On Dec 16, 2017

मन एकाग्र करुन ही कविता ऐका, कवितेचा भावार्थ लक्षात घ्या, आपसूकच डोळ्यात पाणी येईल...

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

होतात देऊळेँ नष्ट, होतात देवता भ्रष्ट ।
गो ब्राह्मन ओरडती, धर्मावरती संकष्ट ।
न्याय निती उरली नाही, सारेच भोगिती कष्ट ।
हा घोर मांडिला ज्यानी, त्यांचिया पुढे जावोनी ।
देशाभिमान सोडीनी, प्रेमाच्या मंगल माते ! ।

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

तूं सांग ! तुझ्या चरणाशीँ, ही तोडुन ठेवीन मान ! ।
तूं सांग ! तात चरणाशीँ, कापोनी ठेविन मान ! ।
गोब्राह्मण यांच्या करितां, खङगावर ठेविन मान! ।
परी परके सत्ताधारी, गृहीँ शिरुन झाले वैरी ।
बघताच तयांना भारी, सक्रोध वृती मम होते ।

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

मी म्हणतां 'नाही नाही', दरबारी नेलेँ आई ? ।
जोँ आंत शिरोनी पाही, वर चढोणी गेली भुवई ! ।
मुजर्याला हात न वाही, शिर लववूं शकलोँ नाही ! ।
हेँ सिँहासन कोणाचें ? हेँ वैभव तरी कोणाचेँ ? ।
काहूर मनीँ प्रश्नांचे, अपहारी नृपसत्तेतेँ ।

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

एकटाच रात्रीँ बसतो, मी जन्मभूस आठवतो ! ।
ढळाढळा आई गे ? रडतो, त्वेषाने क्षणीँ संचरतो ! ।
झोपेँत देशबंधूंच्या, दुःखानेँ दचकुन उठतो !।
बोलते भवानी ""ऊठ"", बोलते जन्मभू ""ऊठ"" ।
""धर समशेरीची मूठ"", अवमानून त्या आज्ञेतेँ।

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

देशाचा राजा नाही, राजनिष्ठ राहूं कैसा ? ।
धर्माचा राजा नाही, राजभक्त होऊं कैसा ? ।
या उलट्या बोध गळातेँ, जीवाचा अडके मासा ! ।
ज्या शिरीँ भार देशाचा, ज्या शिरीँ भार धर्माचा ।
कर्तव्येँ वाहावयाचा, विसरुन देशधर्मातेँ ।

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

स्वाभिमान सुटला ज्यांचा, देशभक्ति सुटली ज्यांची ।
कुलकीर्तीचा इतिहास, स्मृति देई न उज्जवलतेची ।
वाढवोत ते ते शोभा, दास्याच्या दरबाराची ।
""उद्दाम"" म्हणो कुणी मातेँ, कीँ करोत उपहासातेँ ।
परी जागोनी स्वत्वातेँ, हिन्दूद्वेषी या तख्तातेँ ।

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

सुलतान जाहला क्रूध्द, उमराव जाहले क्रूध्द ।
जातिवंत झाले स्तब्द, जनकही होय हतबुध्द ।
परि तुझी आणि अंबेची, शिरीँ कृपा असावी शुध्द ।
मावळचे जमवुन भाई, स्थापीन मराठेशाही ।
गाडीन आदिलशाही, बोलतोँ सत्य जेँ गमतेँ ।

॥ लववेना हेँ शिर माते ! ॥

************************
कवी- दुर्गादास आसाराम तिवारी. ज्यावेळी शिवप्रभू लहान असताना शहाजी महाराज यांचे बरोबर विजापूर दरबारात गेले, त्यावेळी त्यांच्या मनातील खंत कवितारुपात मांडले वर्णन.

show more

Share/Embed