Hatkeshwar to Lenyadri Range Trek on 4 Feb 2024- 16 Km
Shreepad Deshpande Shreepad Deshpande
479 subscribers
260 views
54

 Published On Feb 15, 2024

हटकेश्वर ते लेण्याद्री
कोळेवाडी हटकेश्वर लेण्याद्री
गणपती पर्यंत 12.5 km चा
ट्रेक आहे.
कोळेवाडी गावातून सकाळी 6.30
वाजता ट्रेकला सुरवात
केली, सकाळी 10 वाजता आम्ही
मंदिरा जवळ पोहोचलो.
लेण्याद्री गणपती मंदिरात दुपारी
3.30 वाजता पोहोचलो.
एकूण 9 तास लागले.
कोळेवाडी ते हटकेश्वर मंदिर
साडेतीन तास चढायला लागले.
हटकेश्वर ते लेण्याद्री गणपती मंदिर
साडेतीन तास लागले.

डोंगरावर हटकेश्वर शिव मंदिर,
2 गुहा, 3 टाक्या आहेत.
माथ्यावर हे सगळ पाहण्यासाठी वेळ
लागतो.
छोटया गुहेमध्ये गणेश मुर्ती आहे.
दुसरी गुहा आतमध्ये खोलवर अरुंद
होत जाते, किती खोलवर
आहे कळत नाही.
मंदिराच्या बाजूला पाण्याची टाक
आहे, पण त्यातील पाणी
पिण्यास योग्य नाही. जेथे नैसर्गिक
पूल/नेढ आहे त्या बाजूला
2 टाक आहेत, त्यात एक बुजलेले
आहे. बुजलेल्या टाकीच्या
वरील, टाकीतील पाणी पिण्यास
योग्य होते.

कोळेवाडी तून जाणारी वाट
मळलेली नाही, त्यामुळे चुकायला
होते. खास करून वरच्या टप्प्यातील
वाट, काही ठिकाणी
कारवीच्या झाडीतून वाट जाते.
बरेच ठिकाणी वाटेत माती
भुसभुशीत आहे, त्यामुळे पाय
सरकन्याचे प्रमाण जास्त आहे.
खास करून माथ्यावर पोहोचण्याचा
आदि एक कातळ टप्पा
आहे. तिथे माती जास्त पडते. ह्या
टप्प्यावर दोर घेऊन गेले तर
जास्त सोयीचे ठरेल.

रात्री कावडधारा देवी मंदिरात वस्ती
केली, मंदिर महामार्गाला
लागूननच आहे. मंदिरात 50 माणसं
झोपू शकतात. पण मंदिर
संध्याकाळी बंद करतात, त्यामुळे
गावातील पुजारी कडून चावी
आधीच घ्यायला लागते. कोळेवाडी
गावात आत ही मारुती
मंदिर आहे, ते मंदिर ही संध्याकाळी
बंद करतात.

आम्ही हॉटेल हर्ष मध्ये सकाळच्या
नाश्त्याची सोय केली होती.
त्यावेळी त्या हॉटेल मालकाने
आमच्यासाठी मंदिराची चावी घेऊन
ठेवली होती. आम्ही त्यांचा कडून
चावी घेतली.

हॉटेल हर्ष - गणपत कुमाकर -
9766562973

show more

Share/Embed