General Provident Fund भविष्य निर्वाह निधी वर्ग ३,२ व १ चे विवरणपत्र सेवार्थ प्रणालीतुन कसे काढावे?
Pramod Puri Pramod Puri
42.7K subscribers
14,281 views
152

 Published On Premiered Oct 2, 2020

General Provident Fund भविष्य निर्वाह निधी वर्ग ३,२ व १ चे विवरणपत्र सेवार्थ प्रणालीतुन कसे काढावे?
भविष्य निर्वाह निधी चे विवरणपत्र सेवार्थ प्रणाली मधून ऑनलाइन दिसण्याची सुविधा शासनाने प्रधान केली असून महालेखाकार कार्यालय यांनी शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी लेखी सेवार्थ पोर्टल ला उपलब्ध करून दिली आहे व त्याच अनुषंगाने सेवार्थ आपल्याला सेवार्थ प्रणाली वर एम्प्लाइज कॉर्नर वर ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. ती कशी पहावी एम्प्लाइज कॉर्नर कसा शोधावा? तसेच स्लीप कशी काढावी याबाबत ची चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून व जीपीएफ स्लिप च्या माध्यमातून पाहणार आहोत.

याकरिता आपणास Url: https://sevaarth.mahakosh.gov.in प्रथम सेवार्थ आयडी व त्याचा पासवर्ड हवा सेवार्थ आयडी माहीत असली व पासवर्ड आपल्याला ifms123 हा आहे असे माहित असताना सुद्धा आपणास लॉगइन करता येत नाही. या करिता आपणास सर्वप्रथम आपला सेवार्थ आयडी व पासवर्ड ifms123 टाकून लॉगिन व्हावे व पासवर्ड टाकून लॉगीन होता आले नसल्यास आपण कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे डी डी ओ लॉगिने जे ज्यांच्याकडे पासवर्ड असेल त्यांना लॉगिन करण्यास सांगणे व लॉगीन झाल्यानंतर वर्क लिस्ट = payroll change= and reset employees password =please fill up sevarth ID =name of employee= date of birth =and date of joining in government service एवढी माहिती भरून verify and reset password करावयास सांगणे व हा आपला सर्वांचा अधिकार आहे कार्यालय आपणास पासवर्ड रिसेट करून देण्याबाबत दिरंगाई करू शकणार नाही त्यांनी पासवर्ड रिसेट केल्यानंतर आपण पुन्हा सेवार्थ मध्ये सेवार्थ आयडी व पासवर्ड ifms123 हा टाकून लॉग इन करावे एवढेही करून लॉगिन झाले नाही तर पुन्हा कार्यालयाच्या असिस्टंट लॉगिन नी लॉगइन होऊन वर्क लिस्ट =payroll =change=change pay and post details ला क्लिक करून सेवार्थ आयडी टाकून आपला डाटा शोधावा त्यामध्ये डाव्या साईडला चौकोनी बॉक्स असून त्याला टिक करावी व चेंज पे डिटेल्स ला क्लिक करावे व त्या ठिकाणी with effect from date मध्ये आज ची तारीख टाकून व पत्र क्रमांक व दिनांक नोंदवून डाटा सेव करावा हे केल्यानंतर आपली सेवार्थ आयडी व डिफॉल्ट पासवर्ड टाकून सेवार्थ ओपन होईल.
सेवार्थ मध्ये लॉग इन केल्यानंतर एम्पलाई कॉर्नर मध्ये जाऊन त्या ठिकाणी view GPF slip आपले भविष्य निर्वाह निधीची माहिती भरायची आहे त्यामध्ये प्रामुख्याने कॅपिटल मध्ये सीरियल नंबर अंडरस्कोअर भविष्य निर्वाह निधी क्रमांक अंडरस्कोअर आपली जन्मतारीख जी सुरुवातीला वर्ष नंतर महिना व दिवस त्यानंतर अंडरस्कोअर सेवार्थ आयडी सर्वच कॅपिटल मध्ये टाकावेत. व त्यानंतर आपणास भविष्य निर्वाह निधी चे विवरणपत्र दिसेल व त्यामध्येये काही अडचण आल्यास आपण [email protected] वर आपले नाव, सेवार्थ आयडी, महालेखाकार नागपुर/ मुंबई, भविष्यय निर्वाह निधी खाते क्रमांक, जन्मतारीख, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आपला सेवार्थ आयडी व पासवर्ड हे सर्व डिटेल्स मेल करावे.

भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र हे प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःला काढावे लागेल कार्यालयाला काढण्याची कोणतीही सुविधा नाही त्यामुळे आपण आपला सेवार्थ आयडी व पासवर्ड ऍक्टिव्ह करावा
पुढील माहिती व्हिडिओ द्वारे आपणास पुरवण्यात येईल कृपया ती पहावी.

show more

Share/Embed