वेस्ट डिकंपोजर भयानक षडयंत्र आहे का?
कृषी मंथन कृषी मंथन
621K subscribers
55,493 views
1.5K

 Published On Jan 11, 2019

*"वेस्ट डि-कंपोजर" याबद्दल सविस्तर माहिती
शेतकरर्‍यांसाठी एक महत्वाची बातमी. नगण्य किमतीच्या कल्चर पासुन घरात सेंद्रिय खताचा कारखाना सुरु करा व अत्यल्प खर्चात लाखाे लिटर सेंद्रिय खत घरीच बनवा !!! आत्ता
सेंद्रिय शेती करणे झाले स्वस्त !!! सेंद्रिय ऊत्पादन मस्त !!!!🌲🌲🌲
❇ *"वेस्ट डि-कंपोजर"- विशेष माहिती.*❇
नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग गाजियाबाद (UP) द्वारा प्रसिद्ध केलेल्या "वेस्ट डि कंपोजर" च्या चार शास्त्रज्ञांनी (डॉ. कृष्ण चंद्र, डॉ. वी. प्रविण कुमार, डॉ. रश्मी सिंह व डॉ. पुजा कणोजीया) मिळुन या उत्पादनाची निर्मित केली आहे.

आत्ता पाहूया "वेस्ट डि-कंपोजर" मध्ये नेमके काय आहे. यात खालील चार मुख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत.
1) Cellulose degrading Bacteria
2) Xylan degrading Bacteria
3) Phosphorus solubilizing Bacteria (PSB)
4) Potash solubilizing Bacteria (KSB)

ICAR-IIFSR च्या अहवालानुसार यामध्ये त्या ४ जिवाणुचा कावुंट तीव्रता खालील प्रमाणे आढळते.
1) Cellulose degrading Bacteria (१०.०×१०७)
2) Xylan degrading Bacteria (२.४ ×१०४)
3) PSB (२.० ×१०७)
4) KSB (८.० × १०४)

सर्व सामान्य शेतकरी व माहितगार व्यक्तींना यातील खालचे दोन बॅक्टेरिया (PSB व KSB) परिचीत आहेत.
👉 तर आता माहिती घेऊया यातील सर्वात पहिल्या घटकाची म्हणजे
Cellulose degrading Bacteria .
याच्या नावातच याची अोळख आहे. Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच काष्टा पासुन किंवा टाकावू पदार्था पासून कार्बन विलग करणारा जिवाणू. हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
याच जिवाणू वरूनच या प्रोडक्टचे नाव ठरविण्यात आलें आहे. तेंव्हा सहाजीकच याच जिवाणूची तीव्रता (कावुंट) या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे.
त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते. वेस्ट डि कंपोजर मधिल याच जिवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाणे (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे.
परंतु, पिकास जमीनीतूनही बरेच काही हवे असते, ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे.

show more

Share/Embed