BJP नेत्यांना Sharad Pawar गटात सहज एंट्री मिळण्यामागे Ajit Pawar यांना चितपट करण्याचा कोणाचा डाव ?
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
201,112 views
2.2K

 Published On Aug 25, 2024

#BolBhidu #SamarjeetGhatge #SharadPawar

परवा समरजीत घाटगेंनी तुतारी हातात घेतली, पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसच्या या नेत्याने 2016 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले नेते म्हणून त्यांनी ओळख तयार झाली. पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात फडणवीसांनी स्वत:ची अशी जी काही माणसं तयार करण्यास सुरवात केली होती त्यातल्या पहिल्या फळीतलं नाव म्हणजे समरजीत घाटगे. पण हे समरजीत घाटगे अगदी सहजपणे तुतारी हातात घेतात. अगदी सहजपणे त्यांना शरद पवार गटात प्रवेश मिळतो आणि देवेंद्र फडणवीसांना अथवा भाजपच्या कोणत्याच नेत्यांना समरजीत घाटगेंना रोखू वाटत नाही. ना बैठका होतात ना चर्चा घडल्याच्या बातम्या येतात. लगोलग चर्चा होतेय ती हर्षवर्धन पाटलांची. हर्षवर्धन पाटील देखील पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते. मात्र भाजपने सध्या त्यांना ऊस आणि साखर या दोन विषयांमध्ये राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.

स्वत: अमित शहांनी हर्षवर्धन पाटलांच अनेकदा कौतुक केलय. अमित शहा आणि हर्षवर्धन पाटील हे थेट संपर्कात असतात अस सांगितलं जातं. अस असतानाही हर्षवर्धन पाटील देखील तुतारी हाती घेतील अस बोललं जातय. एका बाजूला राष्ट्रीय व्यासपीठावरची संधी असतानाही हर्षवर्धन पाटील ती वजा करून आमदारकीसाठी तुतारी हाती घेतील, ती ही अगदी सहज आणि भाजप देखील या गोष्टीसाठी विरोध करणार नाही. राज्यातल्या या भाजपच्या नव्याने जोडल्या गेलेल्या टीमच्या हाती तुतारी येतेय आणि ती ही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी अजित पवारांचेच स्टॅण्डिंग उमेदवार आहेत त्यामुळेच एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे पवार घ्यायला लागलेत की भाजपवालेच मुद्दाम पाठवायला लागलेत. पाहूण्यांच्या काठीने साप मारण्याची जी म्हणं वापरली जाते तेच भाजप करू लागलय का? नेमकं काय घडतय आणि का घडतय समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed