शिवडी किल्ला | Shivdi fort | SNTvlogs | Marathi Vlogs
Sahyadri Nature Trails Sahyadri Nature Trails
35.2K subscribers
69,906 views
1.2K

 Published On Sep 20, 2018

मुंबईच्या किल्ल्यांच्या मालिकेतील पुढला किल्ला आहे किल्ले शिवडी
इंग्रजी व फिरंगी बांधणीच्या छोटेखानी गढी (fortress)चा हा उत्तम स्थापत्य नमुना आहे. पुरातत्व खात्याच्या कृपेने हा किल्ला उत्तम रीतीने पुनर्निर्मित झाला आहे. तटबंदीच्या आतमधील गोदामे कार्यालय वगैरे पूर्णपणे अगदी छप्रासकट शाबूत असल्याने जुन्याकाळचा चांगलाच अंदाज येतो. गुजरातचे सुलतान चौदाव्या शतकात राज्य करत असताना मूळची असलेली छोटी चौकी पोर्तुगीज काळात फिरंग्यांनी मजबूत करुन किल्ल्यात रूपांतरित केली पुढे ईस्ट इंडिया कम्पनीच्या अमलात इंग्रजांनी हा किल्ला मराठा सत्तेच्या भयाने आणखीन मजबूत केला. सिद्दी रसूल ने १६८९ ला दोन वर्षे का होईना मुंबईच्या उत्तरेकडील माहीम व परळ बेटांवर ताबा मिळविला होता तेव्हा त्यांचे क्रौर्य अनुभवले. १७८० नंतर इंग्रज कम्पनी चे गोदाम व त्यानंतर तुरुंग म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला गेला.
असा हा माहीम खाडीच्या पूर्व मुखाशी समोरील तुर्भे बेटाच्या नाक्यावर असणारा व घारापुरी बेटावर आणि त्यापल्याड असणाऱ्या उरण व करंजा किल्ल्याकडे लक्ष ठेवणारा इतिहासाचा साक्षीदार आमच्या व्ही लॉग मध्ये नक्की बघा व तुमची मते आणि निरीक्षणे कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा.

show more

Share/Embed