किल्ले पारगड, चंदगड, कोल्हापूर | PARGAD FORT CHANDGAD || SHIVAJI MAHARAJ |सह्याद्री | दुर्गभ्रमण||
Bhatkanti With Sandip Desai Bhatkanti With Sandip Desai
1.16K subscribers
7,301 views
199

 Published On Oct 17, 2022

kolhapurdarshan
कोल्हापूर दर्शन
#सह्याद्री
#पारगड
#भटकंतीवुईथसंदीपदेसाई
#sandipdesai
#संदीपदेसाई
#gadhinglaj
#chandgad
#killepargad
#शिवाजीमहाराज
छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज स्वारी वरुन परत येत असताना पारगडची भौगोलिक रचना पाहून पोर्तुगीजावर नियंत्रण व देखरेख ठेवता यावी यासाठी इसवी सन 1676 रोजी पारगडाची स्थापना स्वतः महाराजांनी केली. स्वराज्यातील पार शेवटचा गड असल्यामुळे गडाचे नाव पारगड असे ठेवण्यात आले. तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा मालुसरे यांना किल्लेदार म्हणून नेमण्यात आले. महाराज या गडावर 18 दिवस वास्तवास होते. चंद्र सूर्य असेपर्यंत हा गड जागता ठेवा अशी आज्ञा महाराजांनी गडकर्‍यांना केली. मुघलांनी गडावर हल्ला करून गड जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये गडाचे तोफखाना प्रमुख विठोजी माळवे यांना वीरमरण आले. गडावर शिवकालीन भवानी मातेचे मंदीर आहे. गणेश तलाव व अनेक पडक्या विहिरी गडावर आहेत. भवानी मातेच्या मूळ मंदिर जसेच्या तसे ठेवून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गडावर हनुमानाचे मंदीर आहे. अतिशय दुर्गम, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या किल्ल्याचा परिसर निसर्गरम्य आहे. अतिशय बिकट परिस्थितीत कोणत्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध नसतानाही गडकर्‍यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गड आजही जागता ठेवला आहे. शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेल्या किल्ले पारगडचा व्हिडिओ नक्की पहा.


🎵 Song: 'Shahed - Indian Fusion' is under a YouTube Free license.
   / djshahmoneybeatz​  
🎶 Music promoted by BreakingCopyright:
   • 🐯 Indian Music (No Copyright) "Indian...  

show more

Share/Embed