Maval Vidhansabha: रवी भेगडेंच्या मागे BJP+ Sharad Pawar ताकद? Sunil Shelke यांचा करेक्ट कार्यक्रम ?
BolBhidu BolBhidu
2.19M subscribers
9,287 views
265

 Published On Oct 13, 2024

#BolBhidu #MavalVidhanSabha #RaviBhegde

मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. तारीख होती 7 मार्च 2024. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी सोडून जाणाऱ्या भुजबळांपासून ते वळसे पाटलांपर्यन्तच्या मतदारसंघात सभा घेतल्या होत्या पण जी भाषा पवारांनी अगदी जवळच्या नेत्यांबाबतही वापरली नव्हती ती भाषा पवारांनी सुनिल शेळकेंबाबत लोणावळ्याच्या जाहीर सभेत वापरली होती… या सभेत पवार म्हणाले होते..तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं, पक्षाचा अध्यक्ष कोण होतं, तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे लक्षात ठेव मी त्या वाटेनं जात नाही आणि गेलो तर सोडत नाही.. या टिकेनंतर एक गोष्ट लक्षात आली होती.

अजित पवारांचा वेगळं होण्याचा निर्णय भले पवारांनी राजकीय निर्णय म्हणून पाहीला असेल, जवळच्या लोकांचं सोडून जाणं देखील पवारांनी राजकारणातून पाहिलं असेल. पण काही आमदारांना पवारांनी पर्सनली घेतलय आणि त्यातलं प्रमुख नाव म्हणजे मावळचे आमदार सुनिल शेळके. मार्च महिन्यातच पवारांनी ठरवलेलं सुनिल शेळके पुन्हा आमदार होणार नाहीत.. आणि मावळच्या मतदारसंघात पवारांनी शेळके पुन्हा आमदार होणार नाहीत असा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरवात केली आहे…मावळ मतदारसंघात सध्या काय चालू आहे.. पवारांनी पर्सनल इंटरेस्ट या मतदारसंघात का घेतला आहे आणि भेगडे आणि भाजप अशी दुहेरी बेरीज मारून पवार सुनिल शेळकेंना मैदानाबाहेर कसे काढतील समजून घेवूया मतदारसंघाच राजकारण या आपल्या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed