Z. P. School Ganpati Decoration & Celebration बाप्पा चा मखर आणि सांस्कृतिक गणेश उस्तव. Ghonsai
Kp the brand Kp the brand
837 subscribers
490 views
0

 Published On Sep 27, 2023

नमस्कार मित्रांनो,
आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे. गणपती स्पेशल व्हिडीओ. मुद्दाम थोडा उशीर केला की तुम्ही घाई गडबीत व्हिडीओ स्किप नको करायला.
तुमच्या घरी पण गणपती बाप्पा चे आगमन झाले असेल मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कसलं डेकोरेशन केलं
आम्ही आमच्या गावातील जिल्हा परिषद घोणसई शाळेचे हुबेहूब डेकोरेशन बनवले ते तुम्हाला दाखवतो
व्हिडिओ सुरू करण्या आधी मला पडलेला प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो.
तुम्हाला माहिती आहे का ? गणपती बाप्पा बोलल्या नंतर आपण मोरया का बोलतो?
चाला याच उत्तर तुम्हाला डेकोरेशन बघता बघता देतो.
मित्रानो कर्नाटक मधील शालिमार नावाच्या गावात गणपती बाप्पाच्या एका भक्ताचा जन्म झाला .त्यांचे नाव मोरया गोसावी असे होते. ते काही काळाने पुण्यातील चिंचवड मध्ये राहायला आले. आणि आपल्या भौतिक गोष्टी सोडून गणपती बाप्पाच्या अखंड भक्ती मध्ये सामावून गेले. मोरया गोसावी यांच्या मुळेच अष्टविनायक यात्रा सुरू झाली आहे. त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांच्या साठी चिंतामणी चे मंदिर बांधले. संत तुकाराम महाराज आणि अजून अनेक संतांनी सुद्धा सांगितले आहे की मोरया गोसावी यांच्या सारखा गणपती बाप्पाचा एवढा मोठा भक्त कोणी नाही. असे म्हटले जाते की गणपती बाप्पा मोरया गोसावी यांनी प्रसन्न झाले होते आणि मोरया गोसावीची भक्ती बघून त्यांना आशिर्वाद दिला की माझ्या नावा पुढे तुझे नाव घेतले जाईल. त्या नंतर आपण गणपती बाप्पा नंतर मोरया बोलायला लागलो.
मित्रांनो तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.
दर वर्षी आम्ही स्पीकर्स लाऊन पत्ते खेळून रात्र भर जगायचो. तुम्ही पण हे करत असाल. आता हे वाईट आहे चांगल आहे हा वाद मला नाही घालायचा. पण या वर्षी आम्ही भजन गाऊन, बाल्या डान्स करत आणि शाळेचे डेकोरेशन बनवले होते म्हणून सर्व कुटूंब आपल्या शाळेचे दिवस आठवून प्रत्येकाने आपले अनुभव शेअर केले. तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबा सोबत बसून अश्या प्रकारे बाप्पा सोबत कुटुंबाचा पण आशीर्वाद घेऊ शकता. ते कसं आहे ना आपल्या माणसात बसून मन मोकळं करण्यात वेगळीच मजा आहे
तर मित्रांनो नक्की च तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल अश्याच खूप साऱ्या व्हिडीओ साठी मला सबस्क्राईब करा.
या वर्षी तर झाल आम्ही तर पुढच्या वर्षी काय करायचं याची तयारी पण सुरू केली आहे

#india #instagram #explore #viral #reels #youtube
#youtubeshorts #blogger #festival #reality #enjoy #ganpatibappamorya #ganpati #ganpatibappastatus #gajanan #art #dance #dancevideo

show more

Share/Embed