Pune EY Employee Death: अतिकामामुळे पुण्यातील Anna Sebastian चा Cardiac Attack ने मृत्यू झाला
होऊ दे चर्चा....🚩🚩 होऊ दे चर्चा....🚩🚩
35.1K subscribers
829 views
12

 Published On Sep 21, 2024

ईवायई (Ernst & Young (EY) पुणे या कंपनीत काम करणाऱ्या केरळच्या 26 वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला. अन्ना सेबेस्टियन पेरायील असं मृत पावलेल्या तरुणींच नाव असून ती पेशाने सीए होती. कंपनीकडून कामाचा प्रचंड दबाव टाकण्यात आल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला, असा दावा पीडित तरुणीच्या आईने केला आहे. अन्ना सेबेस्टियन पेरायिलची आई अनिता ऑगस्टीनने कंपनी भारतचे बॉस राजीव मेमानी यांना यांसंबधीत एक इमेल लिहिला आहे. परंतु, याबाबत ईवायई कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. (26-year-old Girl from Kerala, who had worked at Ernst & Young (EY) in Pune, Anna Sebastian Pereyal dies because of office work pressure claims her mother)

अन्ना सेबेस्टियन पेरायिलची आई अनिता ऑगस्टीनने कंपनी भारतचे बॉस राजीव मेमानी यांना यांसंबधीत एक इमेल लिहिला आहे. मुलीला खूप जास्त काम दिलं जात होतं. तिच्यावर कामाचा ताण होता, असा दावा ऑगस्टीन यांनी या पत्राद्वारे केला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत ऑगस्टीन यांनी कंपनीवर टीका केली आहे. पेरायील 2023 मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि मार्च 2024 ईवाई पुणे या कंपनीत सामील झाली. पेरायीलची ही पहिली नोकरी होती. आशा आकांशा पूर्ण करण्यासाठी तिथे खूप मेहनत घेतली. परंतु, हे करत असताना तिच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला.

पेरायीलच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, नोकरीला लागल्यानंतर तिला (पेरायील) चिंता सतावत होती. तणावामुळे तिला झोप येत नव्हती. परंतु, तिने कठोर मेहनत घेऊन यशस्वी होण्याचा मार्ग सुरु ठेवला. तिच्या आईने दावा केला आहे की, अनेक कर्मचाऱ्यांनी खूप काम दिल्यानं तिला राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे तिच्या टीमच्या बॉसने सांगितलं की, तिने तिथेच राहावं आणि टीममध्ये सर्वांबाबत असलेलं मतं बदलावं.
ऑगस्टीनने म्हटलंय, क्रिकेट सामने सुरु असल्यावर तिचा व्यवस्थापक नेहमीच बैठका घ्यायचा आणि दिवसाच्या शेवटी तिला काम करायला सांगायचा. त्यामुळे तिच्यावरचा तणाव वाढायचा.
तिला व्यवस्थापकाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात अडणच निर्माण होईल, असं एका वरिष्ठ नेत्यानं कार्यालयाच्या पार्टीत म्हटलं होतं. पण दुर्देवाने हे एक वास्तव ठरलं. या सर्व गोष्टींमुळे ती वाचू शकली नाही. माझी मुलगी उशीरा रात्रीपर्यंत आणि वीकएंडलाही काम करायची. तिला मोकळा श्वास घेण्याची एकही संधी मिळत नव्हती. बॉसने तिला रात्रीच्या वेळी एक काम सांगितलं होतं, ते काम सकाळपर्यंत सुरु ठेवावं लागलं. ऑगस्टीन पुढे म्हणाली, तिच्या सहाय्यक व्यवस्थापकाने एका कामासाठी तिला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. ते काम तिला सकाळपर्यंत पूर्ण करावं लागलं. त्यामुळे तिला विश्रांती घ्यायला वेळ मिळाला नाही.
#corporatelife #worklifebalance #cardiachealth #deloitte #ernst&young#eypune #corporateslaves
#corporatememes #modernslavery #righttolife #annasebastain #cardiacattack #heartattack #bolbhidu #devendrafadnavis #ajitpawarspeaks #ajitpawar #eknathshinde

show more

Share/Embed