Kenjalgad Fort (केंजळगड): Chh. Shivaji Maharaj Forts and History
सह्याद्रीच्या गडवाटा सह्याद्रीच्या गडवाटा
34.6K subscribers
46,574 views
1K

 Published On Feb 7, 2020

भोर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला, परंतु आजही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रायरेश्वराच्या शेजारी भग्न अवस्थेस्त शांतपणे उभा असलेला किल्ला म्हणजे केंजळ गड होय. किल्ल्याची मोक्याची जागा आणि परिसरातील हिरवाईने नटलेला महादेव डोंगर पाहून, पूर्वीचा केंजळगड निश्चितच मनमोहक असेल, असे वाटते. त्यामुळेच केंजळगडास मनमोहनगड असे देखील म्हणतात. तसेच केळंजा असे देखील म्हणतात.

इ. स. च्या बाराव्या शतकामध्ये भोज राजाने केंजळगड बांधला होता. त्यानंतर इ. स. १६४८ मध्ये केंजळगड अदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. इ. स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी मराठी फौजा केंजळगडाकडे पाठवल्या होत्या. त्यावेळी गंगाजी किर्दत नावाचा किल्लेदार किल्ल्याचा किल्लेदार होता. गंगाजीने मराठीशाहीच्या फौजांना चोख प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठे फौज आणि गंगाजीचे सैनिक यांच्यामध्ये झालेल्या लाधैमध्ये किल्लेदार गंगाजी किर्दत मारला गेला आणि केंजळगड मराठेशाहीच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर पुढे मुघलांकडे गेलेला केंजळगड पुन्हा मराठेशाहीत आणण्याचा पराक्रम मराठ्यांनी केला. इ. स. १८१८ मध्ये मराठेशाहीच्या पाडावानंतर इस्ट इंडिया कंपनीने केंजळगडावर वर्चस्व प्रस्थापित केले.

#Kenjalgad

show more

Share/Embed