भरलेली कारली/ मसाला भरून भरलेली कारली रेसिपी/ जराही कडू लागणार नाही अशी भरलेली मसाला कारली recipe
Siddhi food recipes Siddhi food recipes
300 subscribers
72 views
3

 Published On Sep 9, 2024

भरलेली कारली/ मसाला भरून भरलेली कारली रेसिपी/ जराही कडू लागणार नाही अशी भरलेली मसाला कारली recipe





कृती:-


मसाला भरून भरलेली कारली बनवण्यासाठी इथे पाच कारली मध्ये कापून घेतलेली आहे त्यामध्ये बिया सुरीने काढून टाकाव्यात कारली स्वच्छ धुऊन घ्यावीत
गॅसवर एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवावे त्यामध्ये कारली घालावी व दहा ते पंधरा मिनिटं कारली उकळून घ्यावी नंतर कारली काढून घ्यावी व पाणी फेकून द्यावे
मसाला करण्यासाठी एका कढईमध्ये एक चमच तेल घ्यावे त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घालावेत व अर्धी वाटी सुकं खोबरं चिरून घालावा व कांदा खोबरा चांगला भाजून घ्यावा भाजून झाल्यावर थंड करून मिक्सरमधून वाटून घ्यावा
कांदा खोबऱ्याचे वाटण एका भांड्यामध्ये काढून घ्यावं त्यामध्ये एक चमचा हळद घालावी एक चमचा लाल तिखट घालावे एक चमचा धनापूड घालावी एक चमचा गरम मसाला घालावा व थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी भाजीला चवीनुसार मीठ घालून थोडी आलं-लसूण ची पेस्ट घालावी आता हा मसाला हाताने सर्व मिक्स करून घ्यायचा व कारल्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा
गॅसवर कढई गरम करायला ठेवावी, त्यामध्ये दोन चमचे तेल घालावे एक चमचा जिरे घालावे व थोडी हिंग घालावी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालावी व परतून घ्यावे त्यामध्ये भरलेली कारली घालावी त्यामध्ये उरलेला मसाला घालून व थोडे पाणी घालून झाकण ठेवून कारली दहा मिनिटं शिजवून घ्यावी आंबटपणासाठी थोडे कोकम घालावे कारली चांगली शिजवून घ्यावी वरून कोथिंबीर घालून कारले सर्व्ह करावी

आपली मसाला भरून भरलेली कारली तयार आहेत.

show more

Share/Embed