किल्ले रायरेश्वर🚩🙏🏻।vlog no-03| निसर्गाचा अद्भुत चमत्कार🙏🏻
Sahyadri vede Trekkers Sahyadri vede Trekkers
664 subscribers
834 views
52

 Published On Jan 22, 2024

रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.

रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे. रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १८ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.


#gadkille #marathi #viral #shivajimaharaj #fort #fypシ #killeraireshwar #raireshwar #swarajya #maharashtratourism #maharashtrahistory #shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #chhatrapati #youtubevlog #youtubevlogging ##marathivlogger

Kille raireshwar
Raireshwar trekk
Raireshwar fort
Raireshwar
Swarajya
Chhatrapati shivaji maharaj
Chhatrapati sambhaji maharaj
Maharashtra
King of maratha
Pratapgadh to raireshwar trekk
Kenjalgad to raireshwar trekk
रायरेश्वर किल्ला
छत्रपती शिवाजी महाराज
महाराष्ट्र

show more

Share/Embed