सासरच्या घरी आले माहेर माहेरा
dipiaarmarathi dipiaarmarathi
118K subscribers
27,762 views
124

 Published On Jan 1, 2012

सासरच्या घरी आले माहेर माहेरा
माय काय सासू झाली पिता तो सासरा

माझ्या आधी आली येथे नांदण्यास माया
पदोपदी छाया येथे सुखावली काया
किती दुवा देऊ तुजसी ईश्वरा उदारा

हवे तेच लाभले मजसी हवे तेच त्यांना
मूर्तरूप आले मनिच्या मुक्या कल्पनांना
उभय मानसांच्या वेला बहरला फुलोरा

उणेपणा नाही तिळही राहिला सुखाला
मेण होऊनिया जडले भाग्य कुंकवाला
सौख्यसागरासी नाही राहिला किनारा


गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - वैशाख वणवा (१९६४)

show more

Share/Embed