Dr Payal Tadvi Suicide: Protest in Nagpur Sanvidhan square
Orange Katta Orange Katta
3.67K subscribers
888 views
59

 Published On May 29, 2019

एक न झालेली स्टोरी...
#CasteDiscrimimation #DrPayalTadvi #institutionalmurder

"ज्या दिवशी कॉलेजमध्ये आम्ही दाखल होतो तेव्हापासूनच जात आणि रिजर्वेशनवरून टोमणे सुरू होतात. हे केवळ सोबतचे विद्यार्थीच नाही तर टिचर देखील करतात." एक मेडिकल स्टुडंट सांगत होती. "सोबत असताना तर क्वचित प्रसंगी असे अनुभव येतात मात्र आम्ही सर्व मित्र मैत्रिणी व्हॉट्स ऍपच्या गृपवर एकत्र असतो. तिथे रिजर्वेशन आणि जातीवरून पोस्ट शेअर करून जाणून बूजून टारगेट करण्याचे प्रकार आम्ही सहन करतो. यात काही टिचरही सोबत असल्याने त्यांच्याजवळही तक्रार करता येत नाही." आठवडाभराआधी 'सेव मेरीट सेव नेशल' या कॅम्पेनद्वारा आंदोलन करण्यात आलं. तेव्हा तर संपूर्ण व्हॉट्स ऍप गृप याच टोमण्यांनी भरलेला होता." "डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येनंतर एससी एसटी विद्यार्थ्यांचा होणारा अपमान विषय सोशल मीडियावर आला, तेव्हा तर एकाची मजल चक्क रिजर्वेशनसे आये हो, तो तुम्हे थोडी इन्सल्ट तो सहनी पडगी" इतकं बोलण्यापर्यंत गेली.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी नागपूरमधील संविधान चौकात धरणे आंदोलन व कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. समता सैनिक दल व एससी एसटी मेडिकल स्टुडंट असोसिएशन हे सहभागी झाले होते. संध्याकाळी हा कार्यक्रम होता. एका युट्यूब चॅनलसाठी मी आणि स्नेहल स्टोरी कव्हर करायला गेलो. तेव्हा मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते मन मोकळं करत होते. या आंदोलनाला यासाठीही महत्त्व होतं कारण गेल्या आठवड्यातच नागपूरमध्ये 'सेव मेरीट, सेव नेशन' या कॅम्पनेद्वारे आरक्षनाला विरोध करण्यासाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केलं होतं. शिवाय संशयीत आरोपीतील एक मुलगी ही नागपूरच्या शासकीय कॉलेजमधली विद्यार्थीनी होती हे विशेष.

show more

Share/Embed