Marleshwar Mandir : सापांच्या गुहेत राहणार महादेव | Marleshwar Waterfall | Ratnagiri | Rohit Harip
Harifi (हरिफी) Harifi (हरिफी)
896 subscribers
2,616 views
51

 Published On Mar 17, 2024

#marleshwarTemple #ratnagirinews #kokannewsupdate
आंबा... पश्चिम महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या रांगांमधलं खरखुरं वैभव...मावळतीकडे पसरलेल्या डोंगररांगा आणि त्यावर बारा महिने असणारी गर्द वनराई...
या सह्याद्रीच्या अंतरंगात जसंजसं शिरत जावं तसतसं सह्याद्रीची अनेक गुपितं आपल्यासमोर उलगडत जातात. किंबहुना असं म्हणा की, सह्याद्रीवर श्रध्दा असणाऱ्यांना सह्याद्री कधी नाराज करत नाही.
असंच एक ठिकाण म्हणजे मार्लेश्वर देवस्थान......
आंबा घाटात बऱ्याच वेळा जाणं येणं झालं. रस्तात जाताना एक पाटी कायम लक्ष वेधून घ्यायची.
मार्लेश्वर १७ किलोमीटर... पण रस्त्याची हालत आणि जंगल बघून थोडं बिचकायला व्हायचं.
पण यावेळेस देवरुख मार्गे येताना पुन्हा मार्लेश्वरची पाटी दिसली आणि थेट कोणताही विचार न करता गाडी मार्लेश्वरला घातली.
देवरुखातून आंबा घाटामार्गे मलकापुरला जाताना मध्ये संगमेश्वर साखरपा रस्त्यावर मार्लेश्वरचा फाटा लागतो.
इथून रस्ता तुम्हाला आत आत घेऊन जात मार्लेश्वरला नेतो.
रस्त्यात हातीव, मारळ ही गावं लागतात.
मार्लेश्वर मंदिराच्या मोठ्या कमानीतून आत गेलं की पार्किगची मोठी जागा आहे.
इथे गाडी पार्क करुन सुमारे ३०० ते ४०० पायऱ्या चढून जावं लागतं.
रस्तात ठिकठिकाणी पुजेची सरबताची दुकानं लागतात.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चिकटून हे देवस्थान आहे.
मंदिराच्या मागे दिसणारा कडाच्या वरती पसरलं आहे ते शेकडो किलोमीटर विस्तारलेले चांदोली नॅशनल पार्क.
याच कड्यावर पुर्वी गोठणं नावाचं गाव होतं. ते आता जंगलातून खाली स्थलांतरित करण्यात आलं आहे.
या जंगलात वाघाचे आस्तिव आहे याचे पुरावे सातत्याने मिळाले आहेत.
मार्लेश्वरवरुन निघाल्यानंतर एक रस्ता थेट आंबा घाटात शिरतो.
मारळ- बामणोली – खडी कोळवण – ओझरे बुद्रुक ही मधली गाव घेत हा रस्ता निघतो तो आंबा घाटात.
हा रस्ता कच्चा आहे काही ठिकाणी खराब आहे पण अतिशय निमर्नुष्य आणि निर्जन असलेल्या पट्ट्यातून हा रस्ता जातो.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चिटकून हा रस्ता जात असल्यामुले अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा वेळ काळ बघूनच या रस्त्याने जाण्याचा निर्णय घ्यावा.
मार्लेश्वर मंदिराचे निमित्त झालं आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या एका नव्या वाटेची सुखरुप भटकंती झाली
या सह्याद्रीच्या राकट, अजस्त्र, बेलाग रांगांमध्ये भटकण्याची ताकद मिळत राहो हीच मागणी मार्लेश्वराकडे करत आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला....

तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि पुन्हा एकदा एक विनंती की चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जुन सबस्क्राईब करा.
--------------------------------------------------------------------------------------------------

show more

Share/Embed