भाग--२: मुहूर्ताची गाणी . मुंजीच्या वेळी म्हणावयाची मुहूर्ताची गाणी
Seema Ayachit Seema Ayachit
4.95K subscribers
27,046 views
229

 Published On Sep 5, 2021

भाग-- २::

भाग पहिला मध्ये आपण लग्न आणि मुंज यावेळी करावयाचे मुहूर्त ,त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्यांचे महत्त्व यासंबंधीची माहिती ऐकली .या भागामध्ये आपण मुंजीच्या मुहूर्ताच्या वेळी म्हणावयाची गाणी ऐकणार आहोत. या गाण्यांमध्ये पहिल्यांदा गणपतीचे गाणे म्हणतात कारण तो विघ्नहर्ता आहे . आपल्या घरचे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गाण्यातूनच गणपतीला प्रार्थना केली जाते. 🙏
त्यानंतर अंबाबाई चे गाणे म्हणतात नंतर आपले कुलदैवत कुलदेवता यांना कार्याला बोलावले जाते आणि नंतर मुंजा मुलगा ,मुंजा ची आई , वडील, करवली , आत्या ,मामा , मावशी,आजी, मैत्रिणी, सगेसोयरे यांची नावे घेवून गाणी म्हटली जातात.
पूर्वी घराघरांतून अशी मुहूर्ताची गाणी म्हणायला महिला होत्या अगदी चढाओढीने गाणी म्हटली जायची पण आता ही गाणी काही जणींनाच येतात .पण आपलेघरचे कार्य तर या गाण्याशिवाय होणारच नाही म्हणून हा पूर्वजांचा ठेवा म्हणजे मुहूर्ताची गाणी आम्ही सर्वांना देत आहोत .
आपल्याला ही गाणी नक्कीच आवडतील ,भावतील आणि आपल्या घरच्या कार्याला कामा येतील. म्हणून आपण ती ऐकावी तसेच या चॅनलला लाईक,शेअर आणि सबस्क्राईब करावे . 🙏🙏
धन्यवाद.
आपला अभिप्राय नक्कीच द्यावा. 🙏🙏
मैत्रिणींनो वरील मुंजीच्या मुहूर्ताच्या वेळी म्हणावयाची गाणी आम्ही तिघीजणी म्हणजे मी सीमा अयाचित, वर्षा कुलकर्णी आणि शिला कुलकर्णी यांनी म्हटली आहेत. 🙏🙏





सौ. सीमा अयाचित, लातूर.

show more

Share/Embed