काकडीचे वडे/तवसाचे वडे/घाऱ्या/घरी वड्याचे पिठ बनवून केलेले काकडीचे वडे/kakadiche vade
Siddhi food recipes Siddhi food recipes
300 subscribers
1,021 views
7

 Published On Sep 23, 2024

काकडीचे वडे/तवसाचे वडे/घाऱ्या/घरी वड्याचे पिठ बनवून केलेले काकडीचे वडे/kakadiche vade





कृती :-

काकडीचे वडे बनवण्यासाठी एक काकडी धुवून घ्यावी तिचे तुकडे करून किसणीवर किसून घ्यावी

काकडीचे वडे बनवण्यासाठी एक वाटी तांदळाचे पिठ घ्यावे,त्यापेक्षा लहान वाटी गव्हाचे पीठ घ्यावे,
दोन चमचे उडदाची डाळ,दोन चमचे चण्याची डाळ,एक चमचा धने,एक चमचा बडीशेप,एक चमचा मेथी दाणे घ्यावे हे सर्व गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये हलके भाजून घ्यावे, व मिक्सर मधून वाटून त्याची पावडर करून घ्यावी,

एका परातीत तांदळाचे ,गव्हाचे पीठ घ्यावे त्यात वाटलेले डाळी व धने बडीशेप चे पीठ चाळून घ्यावे चवीनुसार मिठ घालावे व मिक्स करावे,

गॅसवर एक कढई गरम करून त्यात किसलेली काकडी घालावी व त्यातील पाणी सूखे पर्यंत परतून घ्यावी नंतर ती पीठा मध्ये मिक्स करून घ्यावी,त्यात थोडे थोडे गरम पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे,पंधरा मिनिट झाकुन ठेवावे,

पंधरा मिनिटा नंतर पिठाचे गोळे करून घ्यावे, व त्याचे वडे थापून घ्यावे,

गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे त्यात वडे तळून घ्यावे.

आपले काकडीचे वडे/तवासाचे वडे तयार आहेत.

show more

Share/Embed