खुशियां ही खुशियां - उपवासाच्या पोळ्या ?! | प्रवीण मानकर
Mankar Pravin Mankar Pravin
577 subscribers
124 views
2

 Published On Oct 11, 2024

१०६।खुशियां ही खुशियां

यजमानाच्या घरचं वातावरण सलोख्याचं असेल तर पाहुण्याची मजाच मज्जा. त्यात सासू अन सुनेमध्ये अतंर शून्य असेल तर - लेकीसुनेचं - असेल तर - अकुना मटाटा - प्रॉब्लेम नथी - नो प्रॉब्लेम. यजमानाच्या घरचे अंतःप्रवाह जाणून घेणे हे बॅकपॅकरचं पहिलं चॅलेंज. काळजी नको. अनुभवांती सगळं होतं. बॅकपॅकर आधी गोष्टी ऐकतो आणि वेळ, संधी मिळाली तरच सांगतो. थोडक्यात आधी ऐका अन नंतर ऐकवा. आधी कान द्या अन कान घ्या.

रश्मी माझी यजमान खूप बोलकी आहे. आमची ओळख वीस वर्षांपूर्वीची. पण खुशबू आमच्याकरिता नवीन. आम्हीही तिला नवीन. थोडा वेळ द्या. खुशबू खूप बोलकी आहे. हळू हळू खूप बोलू लागली. उल्काची नवी मैत्रीण झाली. खूप खुश होती आमच्यावर - खुशबू. तिला दोन मुली आहेत. त्या सुद्धा गोड.

आज सकाळी उठलो तेंव्हा खुशबू पोळ्या करत होती. मी तिला विचारलं ' काय करते आहे ?' - तर म्हणे ' उपवासाच्या पोळ्या '. उपवासाला पोळी खाणं म्हणजे ... मग मी जे समजून घेतलं ते भारी होतं. मी लगेच तिचं शूटिंग घेतलं - जन हिताय. तिला ते खूप आवडलं. ख़ुशी खुश झाली. ती खुश म्हणजे जग खुश. आमची पुढंच्या पिढीची यजमान तयार झाली.

आज मला फोटोग्राफीची ऑर्डर मिळाली. किंवा मला ऑर्डर दिली गेली. ऑर्डर काय ? विधीचे फोटो काढायचे. मी ' हो ' म्हणालो असेल काय ?

show more

Share/Embed