ज्येष्ठ समाजसेवक अण्णाजी हजारे यांचे नव्या पेन्शन योजनेवर ताशेरे - ANNAJI HAZARE ON NPS/DCPS
The Patil's The Patil's
9.98K subscribers
2,182 views
48

 Published On Jun 7, 2018

लढ्यासाठी एक होऊ... LET'S UNITE FOR FIGHTS ..

मा. अण्णांचे नवीन पेन्शन योजना व मृत कर्मचारी यांच्या कुटुंबनिवृत्तीवेतनाबाबत सरकारवर ताशेरे


सरकारी नोकर हे एक प्रकारे समाजाची व देशाची सेवाच करत असतात. त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी निवृत्तीवेतन मिळत नाही ही दुर्दवी बाब आहे. तुमची संघटना चांगली आहे, मात्र काही पथ्य पाळा. आपण समाजाचे तसेच देशाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करा. देशात व राज्यात अशा संघटना खूप आहेत. देश राष्ट्र हितासाठी संघटना असावी, तसेच केंद्र व राज्य सरकार सरकार आमदार, खासदारांना फोन, प्रवास, पाणी व वीजबीलात सवलती देऊनही एक एक लाख रूपये पगार देते. हीच मंडळी अधिवेशनात गोंधळ घालून समाजाच्या व देशाचा पैसा वाया आणि वेळ घालवितात मात्र हेच सरकार २००५ नंतर सेवेत आलेल्या सरकारी नोकरांचे अकाली निधन झाले, तर मात्र त्यांच्या कुटुंबांना निवृत्ती वेतन देत नाही ही शोकांतीका असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेऩ्शन हक्क संघटनेच्या राज्यस्तरीय परीसंवादात हजारे बोलत होते. या वेळी संघटऩेचे राज्याअध्यक्ष वितेश खांडेकर, सचिव गोविंद ऊगले, जिल्हाध्यक्ष राजेद्र ठोकळ, प्रविण बढे, अमोल सोनवणे, प्रविण गायकवाड, बाबुराव कदम, प्राजक्त झावरे आदी मान्यवर उपस्थीत होते. हजारे पुढे म्हणाले, आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार आहेत तर मग नविन लोकांना पेन्शनसाठी वेगळे नियम का ठेवले, त्यांच्या कुटुंबाला जगण्याचा आधार मिळावा यासाठी निवृत्ती वेतन गरजेचे आहे. तसेच अकाली निधन झालेल्या सेवकाच्या कुटुंबाला जगण्यासाठी आधार म्हणूनह कुटुंबाला निवृत्ती वेतन मिळावे ही मागणी रास्त आहे. मी याबाबत मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलणार आहे असे आश्वासन यावेळी अण्णासाहेब हजारे यांनी दिले. संघटनेच्या वेबसाईटचे उदघाटनही अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते झाले.

नविन पेन्शन योजनेत १० टक्के रक्कम सेवकांच्या पगारातून व तेवढीच रक्कम सरकार टाकणार आहे. मात्र अपघाती निधन झालेल्या कुटुंबाला पेन्शन नाही ही मोठी दुःखदायक बाब आहे. गेली १५ वर्षात सुमारे तीन हजारावर विविध खात्यातील सरकारी नोकरांचे अकाली निधन झाले, त्यांची कुटुंबे आज हलाखीत उपाशी पोटी जिवन जगत आहेत, याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही, आमच्या मागण्या सरकारने विचारात घ्याव्यात असे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्राजक्त झावरे म्हणाले. या कार्यक्रमात प्रास्ताविक बाबुराव कदम यांनी सुत्रसंचलन योगेश थोरात तर आभार वितेश खांडेकर यांनी मानले.

@मार्तंडराव बुचडे @प्रशांत झावरे...!

show more

Share/Embed