अनावश्यक प्रतिजैविकांचा वापर न करण्याचा तज्ञांनी दिला सल्ला. PUNE NEWS
Express Line Express Line
982 subscribers
107 views
4

 Published On Jul 6, 2024

प्रतिजैविकांचा वापर करणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्या 7 ते 8 टक्के तर, आंतररुग्णांच्या संख्येत झाली 11 टक्क्यांची वाढ - तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

एएमआरचा सामना करण्यासाठी काय करावे लागेल यावर ब्रुसेल्स सिम्पोजियमच्या १२व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिसंवादात तज्ञांनी केली चर्चा


पुणे – पुण्यात आयोजित ब्रुसेल्सच्या प्रतिष्ठित 12 व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय सिम्पोजियम ऑन इंटेन्सिव्ह केअर अँड इमर्जन्सी मेडिसिनमध्ये, देशातील सुप्रसिध्द तज्ञांनी भारतातील अँटी-बायोटिक औषधांचा अतिवापर आणि दुरूपयोग यामुळे विशेषत: बॅक्टेरिआंमध्ये Antimicrobial resistance (AMR) च्या वाढत्या घटना कशा कमी करता येतील यावर चर्चा केली. याकरिता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात नागरिकांना अनावश्यक प्रतिजैविकांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला. या चर्चेत डॉ.कपिल झिरपे, डॉ.सुभल दीक्षित, डॉ.शिरीष प्रयाग, डॉ.तनु सिंघल, डॉ.यतीन मेहता या तज्ज्ञांनी प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता कमी करण्यासाठी आवश्यक रणनीती तयार करण्याचे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

आयएससीसीएम (ISCCM) चे माजी अध्यक्ष डॉ. कपिल झिरपे सांगतात की, पोल्ट्री फार्ममध्ये 75-85% प्रतिजैविकांचा वापर केला जातो. पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिजैविकांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू केले पाहिजेत. जगभरातील बहुतेक नागरिक प्रतिजैविकांचा सर्रासपणे वापर करतात. प्रतिजैविकांचा वापर करणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्या 7 ते 8 टक्के असून, आंतररुग्णांच्या संख्येत झाली 11 टक्क्यांची वाढ तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सेप्सिसबद्दल बोलताना डॉ. सुभल दीक्षित(बेस्ट ऑफ ब्रुसेल्सचे आयोजन अध्यक्ष) सांगतात की, सेप्सिस( रक्ताचा आजार) ही एक जागतिक समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी 10 लाख लोकांना जीव गमवावा लागतो आणि याचसोबत हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकही हे देखिल तितकेच गंभीर ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जगभरातील विविध रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात जवळपास ५० लाख रुग्ण दाखल झाले आहेत. सेप्सिस हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि भारतात मोठ्या संख्येने सेप्सिसचे रुग्ण नोंदविले जात आहेत, जर एएमआर थांबविण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत तर 2050 पर्यंत रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढू शकते.

निकृष्ट दर्जाच्या प्रतिजैविकांवर भर देताना, आयएससीसीएम (ISCCM) चे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष प्रयाग सांगतात की, एएमआरच्या वाढत्या प्रसाराचे एक कारण म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली निकृष्ट दर्जाची अँटीबायोटिक्स. यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे असून केवळ नामांकित संस्थांकडील चांगल्या प्रतीची प्रतिजैविकेच बाजारात उपलब्ध करुन दिली पाहिजेत. भारतात, एएमआर चिंताजनक दराने वाढत असून भारत हे जागतिक स्तरावर एएमआरच्या राजधानींपैकी एक आहे.

डॉ. तनु सिंघल(सल्लागार बालरोग आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) सांगतात की, अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता निर्माण होते. याकरिता सरकार आणि औषध निर्माण करणारे उद्योजक आणि डॉक्टर, रुग्ण या सर्वांनी एकत्र यावे. थेट फार्मसिस्टकडून अँटीबायोटिक्स विकत घेऊ नका. प्रतिजैविकांच्या वापराबद्दल डॉक्टरांना प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे. रुग्णांनी प्रतिजैविकांचा गैरवापर करू नये. एएमआरबद्दल जागरूकता निर्माण करणे खूप महत्वाचे आहे. दिवसेंदिवस बाजारात नवीन औषधे येत आहेत आणि आपण आता अशा ठिकाणी आहोत जिथे कालांतराने संक्रमणांवर उपचार करण्यासाठी कोणतेही प्रतिजैविक शिल्लक राहणार नाहीत. प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सहज निदान आणि उपचार होणाऱ्या स्थितीकरिता प्रतिजैविके लिहून दिली जाऊ नयेत. अँटिबायोटिक्स हा प्रत्येक आजारावर उपाय नाही हे डॉक्टरांनी रुग्णांना समजावून सांगणे गरजेचे आहे.

बेस्ट ऑफ़ ब्रुसेल्सचे सह सचिव डॉ. यतीन मेहता सांगतात की, जेव्हा रुग्ण उपचारासाठी येतो तेव्हा डॉक्टरांनी अनावश्यक अँटीबायोटिक्स लिहून देऊ नयेत.प्रत्येक रूग्णालयात प्रतिजैविक स्टीवर्डशिप प्रोग्रामचे काटेकोरपणे पालन केले जावे. भारत ही जगातील प्रतिजैविक प्रतिरोधक राजधानींपैकी एक ठरली आहे. रुग्णांना कोणती अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे दिली जात आहेत याची माहिती प्रत्येक हॉस्पिटलने देणे गरजेचे आहे.

show more

Share/Embed