Malhargad Fort aka Sonori Fort | मल्हारगड किल्ला उर्फ सोनोरी किल्ला
weekendtravels.in weekendtravels.in
6.46K subscribers
1,279 views
0

 Published On Apr 20, 2024

इतिहास :
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.
पहाण्याची ठिकाणे :
पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीरही आहे, मात्र ती वापरात नसल्याने गडावरील इतर विहिरीं प्रमाणेच यात पाणी अजिबात नाही. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता असेच तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधीव तळे लागते. या तळ्यात उतरण्यासाठी पायर्याा बांधलेल्या अहेत. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे बालेकिल्ल्याच्या तटाला लागून आहे. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलाव पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.
तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकावर असणार्याव बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. याही विहिरीत पाणी नाही. या बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवी कडे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो. झेंडेवाडी गावातून आल्यावर याच दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो.
चोर दरवाजापासून बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. बालेकिल्ल्याचा तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. बालेकिल्ल्यातील दोन मंदिरांची शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून खुणावत असतात. ही दोन मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे, तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी असून या मंदिरात रहायचे झाल्यास फारतर ५ ते ६ माणसे दाटीवाटीने राहू शकतात.
देवळापासून पुढे बालेकिल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या बुरुजाकडे जातांना वाटेत दोन उध्वस्त वास्तू लागतात. त्यापैकी बुरुजा जवळ असलेल्या वास्तूच्या खाली तळघर आहे. त्यात उतरण्यासाठी ५ ते ६ दगडी पायर्याा आहेत. कमान असलेल्या दरवाजातून आपला तळघरात प्रवेश होतो. तळघरात दोन खोल्या आहेत. हे तळघर पाहून पुन्हा प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते.
पानसे (गढी) वाडा :- पेशव्यांचे तोफखाना प्रमुख सरदार कृष्णराव माधवराव पानसे यांनी बांधलेली गढी मल्हारगडच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात आहे. गढीचे १२ फूटी उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार एखाद्या किल्ल्यासारखेच आहे. गढीला ६ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची जाडी ९ फूट व उंची १९ फूट आहे.
गढीत शिरल्यावर प्रथम लक्ष्मी - नारायणाचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरात कोरलेली लक्ष्मी - नारायणाची मुर्ती आहे. या मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७४ रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मुर्ती गाभार्या तील कोनाड्यात ठेवलेली आहे. मंदिराच्या समोर पाण्याच सुकलेल टाक आहे. तर मागच्या बाजूला पायर्याा असलेली मोठी विहिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस ३ छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचा गणपती, सूर्य, यांच्या मुर्ती व शिवलिंग आहेत.
Malhargad is a hill fort in western India near Saswad, 30 kilometres (19 mi) from Pune. It is also known as Sonori Fort due to the village of Sonori being situated at its base. The fort was named for the god Malhari and was the last fort built by the Marathas, in 1775. The Sahyadri range to the west of Pune in Velha taluka is split, and the forts Rajgad and Torna are on one branch while Forts Sinhagad, Purandar, Vajragad and Malhargad on the other. This range is known as the Bhuleshwar range which is spread along the east–west direction. The fort is believed to be built to keep watch on Dive ghat along the Pune-Saswad route. The fort was built during the period of 1757 to 1760. The fort was built by Bhivrâo Yashvant and Krishnaji Mâdhavrâo Pânsê, a Peshwa Sardar, who was the chief in charge of Tofkhana of the Peshwas. Citations of a visit of Elder Madhavrao Peshwe to the fort are available in historic documents. A palace, belonging to Panse, can be seen in the Sonori village though much of it is in ruins. The fort is in good condition. There are two temples constructed side-by-side: the smaller for Lord Khandoba, and the larger for Lord Mahadeva. From the top of this fort, the city of Jejuri and Parvati Hills can be seen.
malhargad
malhargad fort
malhargad diveghat
malhargad saswad
malhargad near pune
forts near pune
forts in pune
sonori fort
maharashtra forts
forts in maharashtra
forts in pune district
maharashtra tourist places
places around pune
historical places near pune
maharashtra trekking places
hidden waterfall sahyadri
maharashtra travel
trending tourist places
satara travel
satara tourist places in marathi
summer tourist places in satara
pune places
places to visit in maharashtra in summer
best staycation in maharashtra
places to visit in thane
maharashtra waterfall

show more

Share/Embed