मा. राजेंद्र केसकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
Vijayraj Maharashtra Prabodhini Academy Vijayraj Maharashtra Prabodhini Academy
3.44K subscribers
363 views
27

 Published On Premiered Dec 15, 2023

महाराष्ट्र प्रबोधिनी नैतिकता व मूल्यांची जपणूक करणारे अधिकारी घडवत आहे-
महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती आयोजित अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेतील 72 यशवंत यांचा भव्य सन्मान सोहळा बारामती येथे पार पडला यावेळी प्रमुख अतिथी मा.इंद्रजीत देशमुख (मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य डॉ.अरुण अडसूळ सर अध्यक्षस्थानी होते यावेळेस सन्माननीय उपस्थितीमध्ये मा. श्री राजेंद्र केसकर सर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मा श्री आनंद भोईटे सर अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अकॅडमी चे संचालक विजयराज चंदनकर उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी मधून पोलीस उपनिरीक्षक(32)राज्य विक्रीकर निरीक्षक (4) कृषी अधिकारी (२३) सहाय्यक अभियंता (7) तसेच महसूल सहाय्यक (6) या पदी यशवंतांची निवड झाली असून अकॅडमीचे 2021- 2022 चे निकाल अजून राहिलेले आहेत
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा इंद्रजित देशमुख सर म्हणाले की संविधानात्मक नैतिकता व मूल्यांची जपणूक करणारे अधिकारी घडले पाहिजेत, अधिकाऱ्याच्या प्रामाणिक कामामुळेच राज्याची प्रगती होत असते.अधिकारी नाही तर लोकसेवक ही सकारात्मक भावना बाळगून संविधान व कायदा प्रमाण मानून काम केले पाहिजे.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ.अरुण अडसूळ सर म्हणाले की प्रशासकाच्या भूमिकेत जाताना आपल्याकडे प्रमुख तीन कौशल्य असण्याची गरज असते एक आपल्या भूमिकेची संबंधित कायदे आणि इतर तांत्रिक बाबी ज्ञात असणे आवश्यक असते दोन मानवतावाद हा प्रत्येक प्रशासकाच्या निर्णयातून व कृतीतून प्रतिबिंबित झाला पाहिजे तीन आपण निवडलेल्या कार्यक्षेत्राची संपूर्ण संकल्पना आपणाला ज्ञात असणे गरजेचे असते
यावेळी बोलताना राजेंद्र केसकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणाले ज्यावेळी मी अकॅडमीच्या उद्घाटनासाठी गेलो होतो त्याच झुडपाचे आज मोठा वटवृक्ष महाराष्ट्र प्रबोधिनी झाला आहे तसेच पुढील वर्षी नक्कीच शंभर विद्यार्थी या अकॅडमीतून यशस्वी होतील असा विश्वास आहे.
यावेळी यशवंतामधून PSI अक्षय पवार ,श्रीकृष्ण काळे, दादाहरी वनवे यांनी मत मांडताना परीक्षेची तयारी व अभ्यासाचे नियोजन याविषयी नेमके मार्गदर्शन केले.महाराष्ट्र प्रबोधिनी टीमची रिझल्ट विषयी असणारी तळमळ व्यक्त केली. आपल्या यशामध्ये विजयराज चंदनकर सरांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांच्या निवडीनंतर पालकांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहणे अत्यंत आनंददायी असते. त्यासाठीच महाराष्ट्र प्रबोधिनी यशवंताच्या सहकुटुंब सत्काराचे नियोजन करते.मागील दोन वर्षापासून जे अधिकारी घडविण्यासाठी कष्ट घेतले होते मागील महिन्यापासून विद्यार्थी व पालकांचे प्रतिक्रिया बघून मनस्वी समाधान वाटत आहे व ग्रामीण भागातील मुलांसाठी महाराष्ट्र प्रबोधिनी नेहमीच तयार असेल असे मत महाराष्ट्र प्रबोधिनी संचालक विजयराज चंदनकर सर यांनी मांडले.


• महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती
•UPSC • MPSC • PSI • STI •ASO •Excise
पत्ता :- पेन्सिल स्क्वेअर बिल्डिंग,एमआयडीसी बारामती
• संस्थापक , संचालक :- मा.विजयराज चंदनकर सर
मो.न :- +91 74983 17155
•Instagram :-   / maharashtra_pra.  .
•Telegram :- https://t.me/+LD8ltiTQ_xZkYTA9

show more

Share/Embed