धनगरी गजी ढोल नृत्य || धनगर परंपरा || भाग - १
Akshay Shingade Vlogs Akshay Shingade Vlogs
520 subscribers
1,304 views
16

 Published On Jul 27, 2024

धनगरी गजी ढोल नृत्य || धनगर परंपरा || भाग - १ #maharashtra #culture #villagelife #dhangari
.
गजानृत्य हे नृत्य धनगर समाजाचे लोकनृत्य आहे. गजानृत्य या शब्दाची फोड केली असता गज म्हणजे हत्ती, या नृत्यप्रकाराचे स्वरूप बघितले असता हत्ती जसा एकाच ठिकाणी उभा राहून डुलत डुलत असतो त्याप्रकारे या नृत्याचे साधारण स्वरूप असते. धनगर समाजाबद्दल जाणकारांनी एक निकष मांडला आहे तो असा- हा समाज मुखत्वे शेळ्या-मेंढ्या पाळून त्यावर आपली उपजीविका करण्याच्या निमित्ताने अगदी गोकुळ, वृंदावन आणि मथुरेहून गुजरातेत आले आणि तेथून महाराष्ट्रात उतरले. त्यामुळे या गजानृत्यात या ठिकाणच्या पारंपरिक नृत्याची झलक आपणास बघावयास मिळते.
.
धनगर समाजाच्या दृष्टीने बिरोबा, धुळोबा आणि शिंगरोबा या दैवतांना विशेष महत्त्व आहे. यातील शिंगरोबाबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी-मुंबई पुणे महामार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंगरोबा म्हणून कोणी एक घनगर रहात होता.

या शिंगरोबा धनगराने आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता वापरून मुंबई-पुणे हा रेल्वेमार्ग कसा तयार करावा याबाबत इंग्रज अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. शिंगरोबा मेंढ्या पाळण्याच्या निमित्त या डोंगरदर्‍यातून फिरला असल्याने रस्ता कसा करावा, बोगदे कुठे तयार करावेत याबाबत इंग्रज अधिकार्‍यांना मार्गदर्शन केल्याने आधुनिक मुंबई-पुणे हा लोहमार्ग तयार झाला. पुढे हा लोहमार्ग तयार झाल्यावर त्या इंग्रज अधिकार्‍याने शिंगरोबाला मारून टाकले. ज्या जागेवर शिंगरोबाला ठार केले त्याठिकाणी शिंगरोबाचे स्मारक म्हणून एक छोटेसे देऊळ बांधले गेले आहे. या शिंगरोबाला हा समाज देव मानतो.
.
सुंबरान मांडीलं ग, सुंबरान मांडीलं
शिंगृबा हे नावाचा, रहात व्हता धनगर.
खंडाळ्याच्या घाटाला गं खंडाळ्याच्या घाटाला
रस्ता नव्हता घावत गोर्‍या सायबाला
शिगृबाला बोलतो रस्ता दाव आम्हाला.
म्होर तवा जायला. म्होर तवा जायला.
रस्ता दावला शिंगृबान गोर्‍या त्या सायबाला.
गोरा सायब झाला बईमान ग झाला बईमान गं.
गोळी त्यान भरलं नी ठार केला शिंगृबा
गोळीयाचा आवाज गं, मेंढ्यांच्या कानाला.
गोळी मग आयकुनी , शिंगृबाच्या भवतन
शेळ्या गोळा मेंढ्या गोळा.
आन गोळा बगा व्होउन, वरडाय लागल्या.
नारळाच फळ या खंडाळ्याच्या घाटाला
फळ बगा देऊनी गाडी गेली निगुनी.
सुंबरान मांडील गं सुंबरान मांडील
.
YouTube Query :-
.
1.थिंक महाराष्ट्र
https://thinkmaharashtra.com › ग...
गजीढोल – धनगरी नृत्‍यप्रकार
2.YouTube
https://www.youtube.com › hashtag
dhangarfolkdance
3.Wikipedia
https://mr.wikipedia.org › wiki
धनगर
4.Wikimedia Commons
https://commons.wikimedia.org › ...
File:Gaji nrutya (Gaji dance ).jpg
5.My Mahanagar
https://www.mymahanagar.com › f...
गजानृत्य
6.मराठी विश्वकोश
https://marathivishwakosh.org › ...
चपई नृत्य (Chapai Dance)
7.Divya Marathi
https://divyamarathi.bhaskar.com › ...
छत्तीसगडमध्ये लाेककला उत्सवात धनगरी गजा नृत्य ...
8.Facebook
https://m.facebook.com › posts
धनगरी गझी नुत्य
9.Esakal
https://www.esakal.com › gaji-nruta...
माणदेशी माणसाची ओळख असणाऱ्या 'गजीनृत्य' खेळाकडे तरुणाईचे दुर्लक्ष

show more

Share/Embed