भात पीक एकात्मिक कीड व्यवस्थापन । कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) सोबत भात पीक शेतीशाळा
Green Revolution Green Revolution
24K subscribers
442 views
15

 Published On Aug 31, 2024

या २६ ऑगस्टला आम्ही गेलो होतो, देवकांडगाव या गावी...
इथे आम्हाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)अमित यमगेकर सरानी भात पिकातील विविध कीड रोगांच्या दृष्टीने एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती कशा वापराव्यात या विषयी माहिती दिली.
आम्ही सकाळी १० वाजता निघालो, कोल्हापूरच्या आजरा तालुकात हे गाव येते. इथे आम्ही उत्तूर मार्गे निघालो. कोल्हापूरचा हा भाग अगदी कोकणासारख्या भासतो, मुसळधार पावसातून सर्वदूर पसरलेल्या भात पिकाचा आस्वाद घेत आम्ही ११ वाजता देवकांडगाव या गावात पोहचलो. या भागात भात, भुईमूग, आणि ऊस शेती केली जाते.
माहिती दिल्यानंतर भातातील पिवळ्या खोडकिड्याच्या खोड किड्याच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचे वाटप केले व प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले. सर्वानी सापळे वापरून किडीचे नियंत्रण करू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन आम्ही परत निघालो.

#farming #organicpestcontrol #croppest #gogreen #agriculture #insectpest #pesticides #organicfarming

show more

Share/Embed