कासेगाव- जोगत्यांचे आराध्य दैवत यल्लमा देवीची यात्रा । Yellamma Devi Yatra
HPN Marathi News HPN Marathi News
1.45M subscribers
70,837 views
521

 Published On Dec 24, 2019

#HPNMarathiNews#Pandharpur#Yellamma_Devi_Yatra#Kasegav
 पंढरपूर तालुकयातील कासेगावच्या यात्रेला जवळपास १०० वर्षांची मोठी परंपरा आहे. या यात्रेचा मान कासेगावच्या देशमुख घराण्याला आहे. देशमुख यांच्या पूर्वजणं दृष्टांत झाल्याने यल्लमा देवीचे कासेगावात  मंदिर बाधंण्यात आले. तेव्हा पासून यात्रेला सुरुवात झाली आहे 

महाराष्ट्रातून येणारे जग आणि जोगती हे कासेगावच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब आदी राज्यातून  जवळपास १०-२० हजार पेक्षा अधिक जोगती यात्रेच्या निमित्ताने कासेगावात हजेरी लावतात. तसेच परंपरागत  चालत आलेल्या आपल्या जागेवरच अनेक वर्षनुवर्षं जोगत्यांचे जग शिस्तीमध्ये विसावतात. यात्रेच्या काळात देशमुख आणि देशपांडे यांच्या घरी देवी माहेरपणाला येते या ठिकाणी सर्वांचा मानपान होतो. यांनतर सर्व जग आणि  जोगती यल्लमा देवीच्या पालखीच्या मागे गाव प्रदक्षिणा करतात. 

विविध राज्यातून आलेले जोगती तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत सहभागी होतात. सुख दुःखाच्या सर्व गोष्टी यात्रेतील भेटीच्या निमित्ताने एकमेकांना सांगतात. आपल्या गुरु सोबत येणारे जोगती या यात्रेत नवीन चेले सुद्धा या यात्रेत तयार करतात. 

यात्रेत आलेले सर्व  जोगती  यांचा  समज आहे कि तिसऱ्या दिवशी  देवी  अग्नीत जाते आणि याच दुःखा मुळे सर्व जोगती आपल्या हातातील बांगड्या फोडून अग्नीत टाकतात. यानंतर यात्रेची सांगता होते . 
Follow us for more latest updates :
Website:-
Facebook:-   / hellopandharpur  
Twitter:- https://twitter.com/HpnMarathiNews?s=03
Instagram:-   / hpn_marathi_news  
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/de...
Whats App:- +91 8007000071

show more

Share/Embed