Video 1 - Pemgiri - Biggest Tree Of Maharashtra - पेमगिरी - महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड
Papillon Films Papillon Films
1.54K subscribers
2,295 views
229

 Published On Jan 13, 2023

#amazingmaharashtra #pemgiri#biggestree#papillonfilms
निवेदन - संजय सपकाळ
छायाचित्रण - शिवनाथ भुजबळ, ऋषिकेश सूर्यवंशी
दिग्दर्शन/ संकल्पना - ज्ञानेश्वर काशिद
लेखन - विजय पवार, अनिल भिलारे
संकलन - विराज निबे
डिजिटल मीडिया पार्टनर
News Today I Love Sangamner
आभार
समस्त पेमगिरी ग्रामस्थ
टीम Papillon Films

पेमगिरी - महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड    • Video 1 - Pemgiri - Biggest Tree Of M...  

येवला पतंग महोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा पतंग महोत्सव -    • Video 2 - Yeola  Kites Festival - येव...  


सांदन दरी ( आशिया खंडातील २ नंबरची सर्वात मोठी दरी ) -    • Video 3 -  SandanValley - सांदन दरी (...  

भारतातील एकमेव गारगोटी संग्रहालय सिन्नर -    • Video 4 - भारतातील  एकमेव गारगोटी संग...  

तुम्हाला माहीत असलेले अजुन काही ठिकाणे नक्की आम्हाला कळवा. ❤️🙏

नमस्कार मंडळी.. अमेझिंग महाराष्ट्र ह्या यूट्यूब डॉक्युमेंटरी सिरीजमधील पहिल्या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत... या सिरीजच्या माध्यमातून आपण, महाराष्ट्रातील अनेक युनिक आणि महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहोत.
तर.. आपल्या आजच्या भेटीचे ठिकाण आहे पेमगिरी.... आपण येथे जातोय... महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड बघण्यासाठी ....
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातलं हे खरंतर एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव. नाशिक पुणे हायवे वर असलेले तालुक्याचे ठिकाण संगमनेर... येथून पेमगिरी साधारणपणे 22 किलोमीटर आहे. पेमगिरी गावाच्या अलीकडेच पेमगिरी किल्ला आहे. याला भीमगड किंवा शहागड असेही म्हटले जाते.
हा किल्ला यादव राजांनी इसवी सन 200 मध्ये बांधला...
जेव्हा दिल्लीचा मुगल सम्राट शहाजहान आणि आदिलशाही या दोन सत्तांनी मिळून निजामशाही संपवली. त्यावेळी मूर्तजा या अल्पवयीन निजामशाहीच्या वारसदाराला गादीवर बसून मराठा सुभेदार शहाजीराजे भोसले... यांनी पेमगिरीच्या शहागडावरून तीन वर्षे राज्य कारभार हाकला.
मराठा स्वराज्य निर्माण व्हावे ही खरंतर त्या मागची भावना होती.
गड उतरून गावाकडे निघाले की साधारणपणे दोन अडीच किलोमीटरवर पेमगीरीच्या महाकाय वटवृक्षाचा डोलारा नजरेस पडतो. सुमारे दोन एकर पेक्षा जास्त परिसरात हा वटवृक्ष पसरलेला असून त्याच्या मुख्य खोडाचा घेर साठ फुटापेक्षा जास्त आहे... सुमारे 90 पेक्षा जास्त पारंब्या या वटवृक्षाला आहे.
या वडाखाली जाखाई जाखमत बाबा ही स्थानिक दैवतांची मंदिर आहेत.
महाराष्ट्रातील ह्या सर्वात मोठ्या विशाल काही महावृक्षाचा विस्तार बघताना खरंच अचंबित व्हायला होतं.
जर तुम्ही पावसाळ्यात पेमगिरीला गेले तर फेसाळणारे धबधबे नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतील. धबधब्यांबरोबरच आजूबाजूचे निसर्ग सौंदर्यही खरच पाहण्यासारख असतं...
वडाच्या झाडाजवळच छोटेखानी हॉटेल आहे. येथे पोट पूजा करून तुम्ही परतीच्या प्रवासाला लागण्याअगोदर पेमगिरी गावातील सुंदर मारुती मंदिर नक्की बघा.
या मारुती मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर लाकडी आहे..
मंदिरामध्ये जवळपास दहा फूट उंच मारुतीरायाची मूर्ती स्थानापन्न आपण असून मंदिरातील शांतता मन प्रसन्न करते...
थोडीशी आडवाट करून नेहमीपेक्षा या वेगळ्या ठिकाणी नक्की या.
आणि हो पेमगिरी सारख्या अनेक हटके ठिकाणांची माहिती करून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा धन्यवाद.

show more

Share/Embed