Nishigandha Wad - Maza Baba | निशिगंधा विजय वाड - माझा बाबा | S 2 - EP # 6
Prarambh Productions Prarambh Productions
5.64K subscribers
108,800 views
1.3K

 Published On Feb 1, 2021

नमस्कार,

निशिगंधाची फुले दिसली की आपल्याला वेधून घेतो तो त्यांचा शुभ्र निरागसपणा व त्यांचं सोज्वळ नाजूक सौंदर्य.

नावाप्रमाणेच निरागस, नाजूक, सदाबहार निशिगंधा वाड या मराठीतील ख्यातनाम अभिनेत्री. बालपणापासून त्यांनी नाटक व दूरदर्शनवर बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनयास सुरुवात केली. मोहन वाघ, सुलभाताई देशपांडे, अरविंद देशपांडे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभले. नाटक, सिनेमा व सिरीयल या तीनही क्षेत्रात त्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

'एकापेक्षा एक'-'शेजारी शेजारी' पासून सुरु झालेला प्रवास 'बाळा जो जो रे', 'प्रेमांकुर', 'सासर महेर' या मराठी चित्रपटांसोबत हिंदीतील 'सलिम लंगडे पे मत रो', 'कर्मयोद्धा', 'दिवानगी', 'तुमको ना भूल पायेंगे', 'आप मुझे अच्छे लगने लगे', 'वझीर' व 'रेस-३' असा यशस्वीपणे सुरु आहे.

पेशाने डॉक्टर असलेले बाबा हे भारत-चीन युद्धात पाच वर्षे मिलिटरी सर्व्हिस करून आले आहेत. कडवा देशाभिमान व करडी शिस्त त्यांच्या स्वभावाचे मुख्य पैलु, परंतु ते तेवढेच ऋजू.

माझे बाबा हे माझं आभाळ आहेत असं निशिगंधा कृतज्ञतापूर्वक लेकीच्या मायेनं सांगतात.

चला तर भेटूया निशिगंधा वाड यांना सोबत आहेत त्यांचे लाडके बाबा.

चला तर, नव्याने समजून घेऊया आपल्या लाडक्या बाबांना !

प्रारंभ प्रॉडक्शन्स.

#mazababa #nishigandhawad
#prarambh_productions
#marathi_interview
#celebrity_talkshow
#trending

show more

Share/Embed