Godeshwar Shiv Temple l Full Guide with Dinesh Sathe l गोंदेश्वर मंदिर, सिन्नर l Sinnar l Nashik
Dinesh Sathe Dinesh Sathe
3K subscribers
171 views
14

 Published On Oct 2, 2024

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.
हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हणले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

अनुभव: खरच आहे की जुन्या ठिकाणी ही वेगळी vibes बेठते. सगळ्या मोठी गोष्टी माझा करिता होती की CD 100 SS घेऊन गेलो, जाईल येवढे माहित होते त्या आलेला अनुभव
वेगळाच होता.

बॅगेत always ठेवावे पाण्याची बॉटल, गाडीला लागणारे लहान मोठे हत्यारे जेणे करुन वाईट प्रसघ आल् तरी तूम्ही त्या मधून मार्ग काडून पुढे जाऊ शकतात.

show more

Share/Embed