Siddhagad Fort | Siddhagad Fort Trek | Most Adventurous Trek | सिद्धगड | Murbad | Ahupeghat |
Vishal Mane Vlogs Vishal Mane Vlogs
6.63K subscribers
2,215 views
127

 Published On Premiered Feb 4, 2023

🙏सिद्धगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुरबाड ते म्हसा आणि येथून २१ किमी अंतरावरील सिद्धगड परिसर हा भीमाशंभर अभयारण्यात येतो.नारिवली या गावापासून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पडा हे गाव लागत तिथून पायवाट काढत अगदी जंगलाच्या मधोमध पोहचल्यावर काकड माळ लागत तिथे भावरी कुटुंब फार पूर्वी पासून राहत आहे, तिथून अगदी जवळच हे स्थळ आहे. गर्द झाडे व घनदाट अरण्यात विविध प्रकारचे वन्यजीव, पशु-पक्षी आढळतात. भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येत असल्याने येथील जंगलाचे चांगले संवर्धन झाले आहे. अनेक उपयुक्त वनौषधी येथे आढळतात. दक्षिण तटावर भैरवाचे स्थान आहे.क्रांतीकारकांची भूमी स्वातंत्र्य लढयात ब्रिटिशांना सळो-की-पळो करून सोडणा-या आणि आपल्या प्राणांची आहुती देणा-या वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतीकारकांची ही ‘बलिदानभूमी’ ही तरुणांसाठी स्फूर्तीस्थान आहे.२ जानेवारी १९४३ रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते. तेव्हा पासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र वरती डोंगर माथ्यावर असणारा प्राचीन किल्ला फारसा परिचित नव्हता. तसेच किल्ल्यावर जाणारी वाट पण बिकटच असल्याने ट्रेकर्स व्यतिरिक्त कुणी फारसा तिथे जाण्याचा प्रयत्न करत नव्हते. मुरबाडपासून २१ किमी अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याचा कालखंड निश्चित सांगता येत नसला तरी या ठिकाणी असणारी बौद्धकालीन लेणी, उद्ध्वस्त वाडयांचे अवशेष, सैनिक बराकी, धान्याची कोठारे, पाण्याची टाकी यामुळे किल्ल्याचा थोडाफार इतिहास उलगडण्यास मदत होते. हा किल्ला गायधरा या महत्त्वाच्या घाटरस्त्याच्या लगतच असल्याने त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘भिवाचा आखाडा’ येथे विश्रांतीसाठी थांबत होते. या किल्ल्यावर आजही शेकडो वर्षापूर्वीची एक तोफ आहे. कोकण स्वारीतून (इ। स. १६५७ – ५८ ) शिवाजीराजांनी सिद्धगड काबीज केला होता. पेशवे दप्तरानुसार १७३४ मध्ये मराठयांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काहीकाळ सनिक ठेवल्याची नोंद आहे. १८१८ नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याचे अतोनात नुकसान केले. नंतरच्या काळात या किल्ल्याचा इतिहास पुसटसा होत गेला.

––––––––––––––––––––––––––––––
Track info :

1.

Provided to YouTube by YouTube Audio Library

Morning Mandolin · Chris Haugen

Morning Mandolin ·

℗ YouTube Audio Library

Released on: 2018-02-01

Auto-generated by YouTube.



2.

Provided to YouTube by YouTube Audio Library

Mirage · Chris Haugen

Mirage

℗ YouTube Audio Library

Released on: 2018-07-05

Auto-generated by YouTube.


3.

Provided to YouTube by YouTube Audio Library

Eyes of Glory · Aakash Gandhi

Eyes of Glory

℗ YouTube Audio Library

Released on: 2018-02-01

Auto-generated by YouTube.

4.

Provided to YouTube by YouTube Audio Library

The Rising · Aakash Gandhi

The Rising

℗ YouTube Audio Library

Released on: 2018-11-28

Auto-generated by YouTube.




––––––––––––––––––––––––––––––

Social media:
Ig: https://instagram.com/vishalmanevlogs...

————————————————————-
Our More Videos :
Vasanthad fort :    • Vasantgad Fort |सरसेनापती हंबीरराव मो...  



----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Ignor Hashtags:

#siddhagad #chatrapatishivajimaharaj #maharashtra

show more

Share/Embed