YAVE EKDANTA | GANARAYA YAVE | SATISH BHALERAO
SAZ SARGAM SAZ SARGAM
3.53K subscribers
965 views
14

 Published On Sep 6, 2024

LYRICS: SATISH BHALERAO
MUSIC : CHANDRAMOHAN
EDIT: GIRISH SANGLE
SAZ SARGAM PRODUCTION

गणराया, यावे एकदंता.....

झालो आतुर, तुला भेटाया
दान कृपेचे आम्हास द्याया

यावे एकदंता, यावे गणराया
यावे एकदंता, यावे गणराया

रोज होते तुझी आठवण
नाम घेती इथे सारे जण
प्रारंभी तुझे नाम स्मरण
गाती पोवाडे भक्तगण
साऱ्या भक्तांवर,
साऱ्या जगतावर,
पसरू दे तुझी रे माया
यावे एकदंता, यावे गणराया
यावे एकदंता, यावे गणराया..

शिव गौरीचा आहेस सूत
जगाचा तूच शांती दूत
दुःख आमचे तुला रे ज्ञात
कोण करील त्यावर मात
तूच लंबोदर,
तूच विघ्नहर
लाडका तू देवराया

यावे एकदंता, यावे गणराया
यावे एकदंता, यावे गणराया...

दिन दहा रहा आमच्यात
पूजा आरती धूपा सहित
तुझी आवड सर्वा माहित
लाडू मोदकाची हो खैरात
तुझे स्वागत,
तुझी आरास
बघ लागले कराया

यावे एकदंता, यावे गणराया
यावे एकदंता, यावे गणराया..

या सणात जाऊ रंगून
चिंता जाती कशा निघून
तुझ्या पायाशी आलो दुरून
होऊ धन्य सेवा तुझी करून
तुझ्या येण्याने,
तुझ्या देण्याने
येई रंगत जगाया

यावे एकदंता, यावे गणराया
यावे एकदंता, यावे गणराया..

show more

Share/Embed