Tamasha । शाहीर:- ललकारजी चव्हान । Maharashtra Cultural Program . ‎@TAMASHA / तमाशा 
TAMASHA / तमाशा TAMASHA / तमाशा
2.85K subscribers
114,635 views
310

 Published On Dec 5, 2021

Tamasha । शाहीर:- ललकारजी चव्हान । Maharashtra Cultural Program . ‎@TAMASHA / तमाशा 

{ विडिओ & एडिटिंग यशवंत सुनिल आकरे मो.7218818254 .}

Tamasha (Marathi: तमाशा) is a traditional form of Marathi theatre, often with singing and dancing, widely performed by local or travelling theatre groups within the state of Maharashtra, India.[1] It has also been the subject of several Marathi films. Some Hindi movies have also included Tamasha-themed songs, known as Lavanis, in the past.

Traditional Tamasha is influenced by many Indian art forms and draws from such diverse traditions as kaveli, ghazals, Kathak dance, dashavatara, lalit and kirtan. There are two types of Tamasha: dholki bhaari and the older form, sangeet baari which contains more dance and music than drama. In Maharashtra, the Kolhati groups are traditionally associated with the performance of Tamasha.[1]

तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ (प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच

तमाशातील वाद्य

तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून त्यातली लावणीगायन आणि लावणीनृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्त्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे. भारूड, गोंधळ, पोवाडा (१३ व्या शतकात होऊन गेलेला शारंग देव याने प्रथम पोवाड्याची बांधणी केली होती.) सारंगी, बासरी अशीही काही वाद्य महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. अशी अनेक मराठी लोकसंस्कृतीची भरजरी रूपे महाराष्ट्रात पहायला मिळतात. मृदंग, वीणा, तंबोरा, झांज हे वारकरी लोकपरंपरेतले वाद्य असून सनई, चौघडा, तुतारी हे राजकीय परंपरेतले वाद्य आहेत. ढोल, तुणतुणे, पावरी, खंजिरी, सांबळ, थाळी, किंगरी आदी आदिवासी परंपरेतून आलेले आहेत.

गण
गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. तमाशाचा खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून तमाशाचा सरदार म्हणजे मालक हे आवाहन करतो, सर्व साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवतात आणि सुरत्ये ध्रुपदाचा अंतिम सूर झेलून उंचावर नेतात.


गौळण
गण संपल्यावर काही काळ ढोलकी व कडे यांचे वादन होते. ढोलक्याची लय पुरेशी अंगात भिनल्यावर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते आणि मग गौळण. गौळणींचा विषय असतो श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला. नर्तकी या गोपी होतात आणि त्यांच्यामध्ये वयस्कर असणारी एक ‘मावशी‘ असते. या गोपी मथुरेला दूध, दही, लोणी वगैरे घेऊन जात असतात आणि वाटेत श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी किंवा पेंद्या त्यांना अडवतो. या पेंद्याचे काम करणारा बहुधा सोंगाड्या (हास्य कलाकार) असतो. या वेळेस या दोन पक्षांमध्ये जे विनोदी संवाद होतात ते ऐकून प्रेक्षक खदखदून हसतात. पौराणिक काळाला आधुनिक संदर्भ देऊन केलेला ह्या गौळणी हास्य

फार्स
एकेकाळी ग्रामीण भागातील मनोरंजनाचा हुकमी एक्का असलेला तमाशा व त्यातील गण, गौळण, बतावणी आणि फार्स काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी त्यांचे दस्ताऐवजीकरण करण्याचे मोलाचे काम सोपान खुडे यांनी ‘तमाशातील फार्सा’ हे पुस्तक लिहून केले आहे. ‘तमाशातील फार्सा’ विषयीची त्यांनी दुर्मिळ अशी माहिती जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेऊन मिळवली आहे. या पुस्तकामध्ये ‘फार्सा’बरोबरच लेखकाने गण, गौळण, रंगबाजी, मुजरा, बतावणी आणि वगाविषयी माहिती देऊन, शाहीर पठ्ठे बापूराव, रामा-नामा लबळेकर, सखाराम कोऱ्हाळकर, दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, जगताप पाटील-पिंपळेकर, काळू-बाळू कोल्हापूरकर, दादू इंदुरीकर, किसन कुसगावकर, दगडोबा कोऱ्हाळकर आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या अल्प परिचयाबरोबरच त्यांनी त्यांच्या तमाशात सादर केलेल्या बतावणी फार्साचे काही नमुनेही सदर पुस्तकात दिलेले आहेत. पुस्तक पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर यांनी लिहिलेले फार्स विविध तमाशा फड मालकांनी संपूर्ण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले. मोमीन कवठेकर यांनी लिहिलेला 'लंका कोणी जाळली !' हा फार्स खूप प्रसिद्ध होता आणि 1980 मध्ये मुंबईत झालेल्या तमाशा लेखकां च्या स्पर्धेत या फार्सला प्रथम क्रमांकाचे 'छोटू जुवेकर पुरस्कार' मिळाला होता.


सवालजवाब
मंचावर जर दोन फडांचे (तमाशामंडळांचे) तमासगीर एकाच वेळी असतील तर त्यांच्यांतील सरसनीरस ठरवण्यासाठी त्यांच्यामधे आपाआपसात सवालजवाब होतात. बहुधा पौराणिक कथांवर आधारलेले कूटप्रश्न एकमेकांना काव्यांतून विचारून त्यांची उत्तरे ओळखण्याचा हा कार्यक्रम असतो.

रंगबाजी
मंचावर होणारे शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण म्हणजेच रंगबाजी. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमासगीर असतील तर त्या रंगबाजीला संगी

“सारं हायब्रीड झालं... ”

“हे असंच चालायचं... ”

“खरं नाही काही हल्लीच्या जगात... ”

“फॅशनच फॅड लागतंय गॉड... ”

“लंगडं.. मारताय उडून तंगडं!”

“लई जोरात पिकलाय जोंधळा... ”


मारू का गेनबाची मेख…”

“बडे मजेसे मॅरेज किया…”

“महात्मा फुल्यांची घेऊन स्फूर्ती, रात्रीच्या शाळेला चला होऊ भरती

  / yashwantakre  

  / yashwant.akare.7  

show more

Share/Embed